"आश्वासनांची पूर्तता न करणे हे भाजपचे वैशिष्ट्य"; जाहीरनाम्यावरून शरद पवारांचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2024 03:57 PM2024-04-14T15:57:16+5:302024-04-14T15:58:06+5:30

"रशियाचा पुतीन आणि भारताचे नरेंद्र मोदी यात काही फरक नाही या निष्कर्षापर्यंत आम्ही आलो आहोत"

Sharad Pawar trolls BJP over manifesto for Lok Sabha Election 2024 Sankalp Patra inaugurated by Narendra Modi | "आश्वासनांची पूर्तता न करणे हे भाजपचे वैशिष्ट्य"; जाहीरनाम्यावरून शरद पवारांचा खोचक टोला

"आश्वासनांची पूर्तता न करणे हे भाजपचे वैशिष्ट्य"; जाहीरनाम्यावरून शरद पवारांचा खोचक टोला

Sharad Pawar on BJP manifesto Sankalp Patra  inaugurated by PM Narendra Modi: लोकसभा निवडणुकांच्या मतदानाचा पहिला टप्पा आता जवळ आला आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. काँग्रेसने काही दिवसांपूर्वी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. त्यानंतर आज भाजपाने आपला जाहीरनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रसिद्ध केला. त्यांनी या जाहीरनाम्याला 'संकल्प पत्र' असे नाव दिले आहे. यात भाजपाकडून अनेक आश्वासने देण्यात आली आहेत. या 'संकल्प पत्रा'वर अकलूजमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी टीका केली.

"भाजपने जाहीरनाम्यात जी काही आश्वासनं दिली आहेत, त्यावर आता भाष्य करणं योग्य नाही. कारण अनेक प्रश्नांवर आश्वासनं देणं आणि त्याची अंमलबजावणी न करणं हे भाजपचं वैशिष्ट्य आहे. ईडी, सीबीआय या यंत्रणांचा गैरवापर करणं हे मोदींचं सूत्र आहे. मोदी लोकशाही उद्धवस्त करून हुकूमशाहीकडे जात आहेत. एकही विरोधक निवडून येऊ देऊ नका असं ते म्हणतात. लोकशाहीत सत्ताधारी पक्ष जसा तसाच विरोधी पक्षही महत्वाचा असतो. एकही माणूस निवडून येऊ देऊ नका ही भूमिका घेणं याचा अर्थ रशियाचे पुतीन आणि भारताचे नरेंद्र यात काही फरक नाही या निष्कर्षापर्यंत आम्ही आलो आहोत," अशी बोचरी टीका शरद पवार यांनी केली.

शरद पवार पुढे म्हणाले, "माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील यांनी निवडणूक लढवावी अशी आमच्या सगळ्यांची इच्छा होती. आज  सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील येथे येतील आणि पक्षाच्या नेत्यांच्या उपस्थितीत धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पक्षप्रवेशाचा निर्णय होईल. याचबरोबर लोकसभेसाठी अर्ज भरण्याची तारीख १६ एप्रिल आहे. सोलापुरात दोन्ही उमेदवार लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरतील असे शरद पवार साहेब यांनी सांगितले. याचबरोबर शिवसेनेचे करमाळ्यचे माजी आमदार नारायण आबा पाटील येत्या २६ एप्रिल रोजी पक्षात प्रवेश करणार आहेत."

Web Title: Sharad Pawar trolls BJP over manifesto for Lok Sabha Election 2024 Sankalp Patra inaugurated by Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.