गेल्या काही दिवसांपासून अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारांनी डोके वर काढले आहे. सिडकोतील मुख्य चौक, उद्यान, शाळा तसेच मोकळ्या जागा असलेल्या भागात रात्री उशिरापर्यंत गुन्हेगारी टोळक्यांचा धुडगूस सुरू आहे. ...
नशेची हौस भागविण्यासाठी आपल्या वृध्द आईकडे पैसे मागितले, आईने पैसे दिले नाही, म्हणून घराच्याच भींतीवर जन्मदात्रीचे डोके आपटले. त्यात ८२ वर्षीय कांताबाई शिवलाल काळे यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सातपूर भागात ...
सुरेश पवार याने दोघांना दमदाटी करत शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी सातपूर पोलिसांत सरकारी कामात अडथळा आणणे व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात येऊन पवार यास पोलिसांनी अटक केली आहे. ...
तीन पोलीस ठाण्यांतर्गत राबविण्यात आलेल्या कारवाईत ११ संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र या धाडसत्रामध्ये मोठे मासे गळाला लागले नसल्याचीही चर्चा त्या-त्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत नागरिकांमध्ये सुरू आहे ...
शिंदे गाव, माणिक चौक येथे मुलीने शाळेचा गणवेश व वह्या-पुस्तकांसाठी पैसे मागितल्याचा राग आल्याने दारूच्या नशेत असलेल्या पित्याने मुलीला व मुलाला बळजबरीने विषारी औषध पाजून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. ...
पेठरोड परिसरातील मेघराज बेकरी पाठीमागे असलेल्या एका प्लॉटमध्ये पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर मध्यवर्ती गुन्हे शाखा व म्हसरूळ पोलीस ठाणे यांनी संयुक्त कारवाई करीत गुरुवारी (दि.१८) सायंकाळी छापा टाकून १६ जुगार खेळणाऱ्यांना अटक केली ...
स्वामी विवेकानंदनगर परिसरातील एका अल्पवयीन मुलाचे अपहरण झाल्याची घटना समोर घडली आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...