Maharashtra Vidhan Sabha Election Result, मराठी बातम्याFOLLOW
Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे. Read More
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याऐवजी भाजप थेट नाथुराम गोडसेलाच भारतरत्न का देत नाही? असा सवाल उपस्थित करीत काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते खा. मनीष तिवारी यांनी बुधवारी भाजपवर उपहासात्मक टीका केली. ते नागपुरात आले असता पत्रकार परिषदेत बोलत होते. ...
मागील पाच वर्षांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात झालेल्या विकासाची कामे जनतेत पोहोचविण्यात येत आहेत. संपूर्ण शहरात महायुतीच्या प्रचाराला या दोन्ही नेत्यांच्या नियोजनाचे बळ मिळत असल्याचे चित्र आहे. ...
निवडणुकीत तैनात असलेल्यांपैकी १६,५०० च्या वर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पोस्टल बॅलेटद्वारा मतदान करण्यासाठी अर्ज केला असून त्याद्वारे अनेकांनी तो भरून मतदानाचा हक्क बजावला. ...