Maharashtra Election 2019 : बापूसाहेबांची भूमी चोर, लफग्यांच्या हातात देऊ नका- उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 10:19 PM2019-10-16T22:19:33+5:302019-10-16T22:20:20+5:30

सावंतवाडी बापूसाहेबांची भूमी आहे. शिवरामराजेंचे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मोठे योगदान आहे,

Maharashtra Election 2019 : Don't give Bapusaheb land to hands of thieves, looters - Uddhav Thackeray | Maharashtra Election 2019 : बापूसाहेबांची भूमी चोर, लफग्यांच्या हातात देऊ नका- उद्धव ठाकरे

Maharashtra Election 2019 : बापूसाहेबांची भूमी चोर, लफग्यांच्या हातात देऊ नका- उद्धव ठाकरे

googlenewsNext

सावंतवाडी :  सावंतवाडी बापूसाहेबांची भूमी आहे. शिवरामराजेंचे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मोठे योगदान आहे, त्यामुळे या भूमीत चोर लफग्यांना साथ देऊ नका, दहा घरे फिरणारे तुम्हाला काय देणार नाही, त्यामुळे सावध राहा आणि लाचारांना त्यांची जागा दाखवून द्या, असे आवाहन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले सावंतवाडीत शिवसेना उमेदवार दीपक केसरकर यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या जाहीर सभेत केले, ते प्रचारसभेत बोलत होते, यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार संजय राऊत, विनायक राऊत, शैलेश परब आदी उपस्थित होते. 

पाच वर्षांपूर्वी राष्ट्रवादीचा डाव शिवसेनेने मोडून टाकला, राज्यात मजबूत सरकार शिवसेनेमुळे उभे राहिले, यावेळी पाठीमागून वार झाला, तर वाघ नखे काढू, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. नरसिंहरावांनी काँग्रेस चांगली चालवली होती. काँग्रेस कधीही संपणार नाही, देशाच्या स्वातंत्र्यात काँग्रेसचे मोठे योगदान आहे.

कोकणचा विकास झाला असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले, तेव्हा राणेंनी टाळ्या वाजवल्या, आम्ही गाडलेली भुते तुम्ही जिवंत केलीत, राणे गद्दार पण कोकण भूमी यांना माफ करणार नाही. यापुढे सरकारच्या विरोधात बोलणार, जे पटले नाही त्यावर बोलणार, राज्याची स्वप्ने पूर्ण करणार, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. मुख्यमंत्र्याशी माझे भांडण नाही वेळीच घाण बाहेर काढा. राडा संस्कृती बंद केली, पाच वर्षांत एक ही दंगल झाली नाही, जिल्ह्यातील सर्व बंडखोर उमेदवार राणे समर्थक आहेत, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.  

गोव्यातील मुख्यमंत्र्यांनी लाचाराच्या प्रचाराला येणे दुर्दैव आहे. दहा घरे फिरणारी माणसे सावंतवाडीला काय न्याय देणार, राजन तेली सहा महिने सावंतवाडीच्या जेलमध्ये होते.त्यामुळे ते सावंतवाडीतून निवडणुकीत उभे राहिले, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी राजन तेलींना हाणला आहे. 

Web Title: Maharashtra Election 2019 : Don't give Bapusaheb land to hands of thieves, looters - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.