प्रा. पाटील यांचे पार्थिव चितेवर ठेवून त्यामध्ये कापूर घालण्यात आला. त्यावर विस्तव ठेवण्यात आला. मंत्री पवार यांना तेवढ्याने कसा अग्नी लागणार याबद्दल उत्सुकता होती. त्याला बाहेरून भडाग्नी का देत नाही, अशी विचारणा ते तेथील कर्मचाऱ्यांना करत होते. ...
माईंचा अंत्यदर्शनावेळचा धीरोदात्तपणा आणि बहिणीच्या मागे सावली बनून राहिलेले शरद पवार असा भावा-बहिणीतील नात्याचा अनोख्या कुटुंबवत्सलतेचा पदर मंगळवारी अवघ्या महाराष्ट्राने अनुभवला आणि भाऊ असावा तर असा, असे शब्द आपसुकच बाहेर पडले. ...
माई सांगत होत्या, या घरांत माझ्या दृष्टीने तीनच गोष्टी मोलाच्या होत्या. त्यातील माझा माणूस होता, तो निघून गेला. आता राहिले काय, तर पुस्तके आणि पुरस्कार. ...
अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच त्यांच्या शरीराची हालचाल सुरु झाली. नातेवाईकांनी एका खासगी डॉक्टरांकडून तपासणी केली. त्यात त्यांचा श्वासोच्छ्वास सुरू असल्याचे आढळले. ...