घाटी रुग्णालयातील (घाटी) मेडिसिन विभागाच्या एमआयसीयूत शनिवारी (दि.२०) सायंकाळी अचानक शॉर्टसर्किट झाले. यामुळे वीजपुरवठा खंडित होऊन डॉक्टर, नातेवाईकांची एकच धावपळ उडाली. येथील रुग्णांना त्वरित इतर वॉर्डात हलविल्याने सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही ...
नजीकच्या पारडी येथे अचानक लागलेल्या आगीने बघता-बघता रौद्ररुप धारण केले. यात सात जनावरांचा आगीत होरपळून मृत्यू झाला तर सहा जनावरे गंभीर जखमी झाली आहेत. ही घटना शुक्रवारी दुपारी ३.१५ वाजताच्या सुमारास घडली. ...
पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकाकडून गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील दोन दुकाने जळून खाक झाली आहेत. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. ...