उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 06:45 IST2026-05-15T06:40:19+5:302026-05-15T06:45:17+5:30

Uttar Pradesh Viral video: बाराबंकी, बहराईच, कानपूर देहात, बस्ती, संभल, हरदोई आणि उन्नाव यांसह किमान १९ जिल्ह्यांत मनुष्यहानी, पशुधन हानी आणि पिकांच्या नुकसान झाले आहे.

111 people died in heavy rains in Uttar Pradesh; one person was thrown 50 feet | उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला

उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला

लखनऊ : उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार वादळ आणि मुसळधार पावसामुळे किमान १११ जणांचा मृत्यू झाला असून ७२ जखमी झाले आहेत. यात अनेक झाडे उन्मळून पडली आणि कित्येक घरांचे नुकसान झाले.

बाराबंकी, बहराईच, कानपूर देहात, बस्ती, संभल, हरदोई आणि उन्नाव यांसह किमान १९ जिल्ह्यांत मनुष्यहानी, पशुधन हानी आणि पिकांच्या नुकसानीच्या घटना समोर आल्या आहेत. 

प्रचंड वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे झाडे आणि वीजखांबही उन्मळून पडले. त्यापैकी अनेक झाडे रस्त्यावर कोसळल्याने वाहने चिरडली गेली आणि घरांचे नुकसान झाले. यानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले.

या वादळात ८७ घरांचे नुकसान झाले. या घटनांची पडताळणी करून बाधितांना मदत देण्याचे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत.   

एक व्यक्ती ५० फूट उडाला

भीषण वादळामुळे झालेल्या नुकसानीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले. त्यापैकी बरेलीतील बमियाना गावातील एक व्हिडिओ विशेष चर्चेत राहिला. त्यात वाऱ्याच्या तडाख्यामुळे नन्हे मियाँ हे छपरासह ५० फूट हवेत फेकले जाऊन शेतात पडताना दिसले. 

वादळाच्या वेळी स्वतःचा बचाव करण्यासाठी मियाँ यांनीटिनशेड पकडून ठेवले होते. मिर्झापूरच्या गौरा प्रमाणपूर येथेही पाँटून पूल खराब झाला असून, त्यामुळे २० गावांचा संपर्क तुटला आहे.

Web Title : उत्तर प्रदेश में तूफान से 111 की मौत; एक व्यक्ति 50 फीट ऊपर उड़ा

Web Summary : उत्तर प्रदेश में भीषण तूफान और बारिश से 19 जिलों में 111 लोगों की मौत हो गई, 72 घायल हो गए। पेड़ और बिजली के खंभे उखड़ गए, जिससे घर क्षतिग्रस्त हो गए। एक आदमी हवा में 50 फीट ऊपर उड़ गया। राहत कार्य जारी है।

Web Title : Uttar Pradesh Storms Kill 111; Man Soars 50 Feet

Web Summary : Severe storms and heavy rains in Uttar Pradesh caused 111 deaths and 72 injuries across 19 districts. Trees and power lines fell, damaging homes. One man was lifted 50 feet by the wind. Relief efforts are underway.