Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 06:57 IST2026-05-15T06:55:30+5:302026-05-15T06:57:25+5:30

Petrol Diesel Price Hike Updates: केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेने पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होणार असल्याचे संकेत आधीच दिले होते. त्यानंतर आज तेल वितरण कंपन्यांनी इंधनाच्या दरात वाढ केली. 

Inflation continues, petrol and diesel prices increase! Fuel has become expensive by Rs 3 per liter, what are the prices in Maharashtra? | Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन

Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन

इराण-अमेरिका युद्धामुळे महागाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत. भारतावरही या युद्धाचे गंभीर परिणाम झाले असून, इंधनाच्या किंमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढल्यानंतर भारतातील तेल वितरण कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात प्रति लिटर ३ रुपयांनी वाढ केली आहे. १५ मे पासून हे दरवाढ लागू झाली आहे. 

बऱ्याच काळापासून स्थिर असलेल्या पेट्रोल-डिझेलच्या दरात शुक्रवारी (१५ मे) वाढ झाली. युद्धामुळे कच्चा तेलाच्या किंमती वाढल्या असून, त्याचबरोबर आयातीवरही परिणाम झाला आहे. तेलाच्या आयातीचा खर्च वाढला असून, याचा थेट भार आता ग्राहकांवर पडण्यास सुरूवात झाली आहे.

तीन रुपयांनी महागले पेट्रोल डिझेल, प्रमुख शहरातील दर काय?

नव्या दरवाढीमुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. राजधानी दिल्लीमध्ये तीन रुपयाच्या वाढीसह पेट्रोलचे दर प्रति लिटर ९७.७७ रुपयांवर पोहोचले आहेत. डिझेल दरही प्रति लिटर ९०.६७ रुपये इतके झाले आहेत.

आर्थिक राजधानी मुंबईमध्येही पेट्रोल ३.१४ रुपयांनी वाढून १०६ रुपये प्रति लिटरवर गेले आहे. दरवाढीमुळे डिझेलच्या नव्वदीपार गेले आहेत. आता मुंबईत डिझेल प्रति लिटर ९३.१४ प्रति लिटर दराने मिळत आहे. 

कोलकातामध्ये पेट्रोल ३.३९ रुपयांनी वाढून १०८.७४ रुपये प्रति लिटर झाले आहे. डिझेलमध्येही ३.११ रुपयांनी वाढ झाल्याने ते ९५.१३ रुपये प्रति लिटर इतके पोहोचले आहे. चेन्नईमध्येही पेट्रोलच्या ३.११ रुपये वाढ झाली असून, प्रति लिटर १०३.९० रुपयांवर दर पोहोचले आहेत. 

चालू वर्षात पहिल्यांदाच दरवाढ

इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्ध सुरू झाल्यानंतर कच्च्या तेलाचे दर वाढले. तेल वितरण कंपन्यांकडून दरवाढीची शक्यता असतानाच केंद्र सरकारने मार्च २०२६ मध्ये पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. त्यामुळे काही काळ इंधनाचे दर काही काळ स्थिर राहिले. 

दरम्यान, मार्च २०२६ मध्ये सामान्य पेट्रोल-डिझेलचे दर कायम ठेवत असतानाच तेल वितरक कंपन्यांनी प्रिमियम इंधनाच्या दरात वाढ केली होती. XP100 100 Octane, Speed आणि Power या प्रीमिय इंधनाच्या दरात २ रुपये ते २.५० रुपये वाढ करण्यात आली होती. 

Web Title : महंगाई की मार: पेट्रोल, डीजल के दाम बढ़े! ईंधन ₹3/लीटर महंगा

Web Summary : ईरान-अमेरिका तनाव से महंगाई बढ़ी। भारत प्रभावित, वैश्विक कच्चे तेल की कीमतों में उछाल के बाद ईंधन ₹3/लीटर महंगा हुआ। नई दरें 15 मई से लागू।

Web Title : Inflation Bites: Petrol, Diesel Prices Surge! Fuel Up ₹3/Litre

Web Summary : Iran-US tensions fuel inflation. India impacted, fuel prices hiked ₹3/litre after global crude oil surge. New rates effective May 15th.