Diwali Festival 2025 News in Marathi | दिवाळी २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Diwali, Latest Marathi News
पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2025) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
दिवाळीच्या दुसऱ्या म्हणजे नरक चतुर्दशी दिवशी मुंबईकरांनी पहाटे अभ्यंगस्नान करत दिवसाची सुरुवात गोड केली. उटणे, तेल मर्दन, नरकरूपी पापवासनांचा नायनाट आणि अहंकाराचे उच्चाटन करून दारोदारी मुंबईकरांनी पणत्या तेवत ठेवल्या. ...
पेटलेली पणती मानवी अस्तित्वाची चाहूल देत असते. श्रीमंतांची घरे इलेक्ट्रिकच्या माळांनी सुशोभित असतात. तर गरिबाच्या झोपडीच्या दारात थरथरणारी पणतीतील वात दिलासा देत असते. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून पुढे जाण्याची प्रेरणा यातून दिसते. ...
दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी पहाट अर्थात दिवाळीचा पहिला दिवस रंगला तो तरुणाईच्या लक्षणीय उपस्थितीने. एकीकडे ढोल ताशांचा गजर तर दुसरीकडे डीजे दणदणाट होता. ...
फटाके फोडण्याची विशिष्ट वेळ न्यायालयाने ठरवून दिल्याने मंगळवारी डोंबिवलीतील फडके रोडवरील दिवाळी फटाक्यांच्या नव्हे तर ढोल ताशांच्या गजरात सुरु झाली. विविध ढोल ताशा पथके या दिवाळी पहाट कार्यक्रमात सहभागी झाली होती. ...
काकडे पार्क, चिंचवडगाव येथील पवना नदीमध्ये जलदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. महाराष्ट्राची संपत्ती असलेल्या किल्ल्यांविषयी मुलांना माहिती व्हावी या उद्देशाने येथे खांदेरी किल्ला उभारण्यात आला आहे. ...