भरधाव डंपरने विरुध्द दिशेने जाऊन समोरुन येणा-या रिक्षाला जोरदार धडक दिली. त्यात रिक्षाचा चक्काचूर झाला असून चालक बचावला आहे, तर रिक्षात बसलेला एक जण जखमी झाला आहे. दरम्यान, रिक्षाला धडक दिल्यानंतर डंपर दूधाच्या टॅँकरवर जाऊन धडकला. ...
राळेगाव तालुक्यातील खैरी येथे एका घरावर टाकलेल्या धाडीत बीजी-३ या बोगस कपाशी बियाण्यांच्या २९७ बॅग आढळून आल्या. यात मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ...
कत्तलीसाठी जनावरे नेण्याकरिता आता आलिशान वाहनांचा वापर केला जात आहे. सोमवारी रात्री राष्ट्रीय महामार्गावर स्कॉर्पिओ वाहनातून ६ जनावरांची सुटका करण्यात आली. वडकी पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. ...
वनजमिनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या पथकावर आदीवासींनी केलेल्या हल्ल्यात पोलिस उपनिरिक्षक अरुण शालिग्राम किरडे यांच्यासह १२ पोलिस व वन कर्मचारी जखमी झाले. ...
मोकळ्या जागेत विहीर खोदण्याच्या कारणावरून दोन गटात वाद उफाळून हाणामारी झाली. त्यात दोन जणांना गंभीर दुखापत आहे. दोन्ही गटाने परस्पर विरोधी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी १६ जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. ...