देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
या जनमत चाचणीनुसार मध्यप्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजप १४२ जागा (२०१३ च्या निवडणुकीपेक्षा २३ जागा कमी) जिंकण्याची शक्यता आहे. काँग्रेसला ७७ (२०१३ पेक्षा २० जागा अधिक), अन्य पक्षांना ११ जागांवर विजय मिळू शकतो असे या जनमत चाचणीच्या निष्कर् ...
‘पीएमआरडीए विकासाच्या दृष्टिकोनातून नेमके काय करते याची माहिती नागरिकांना असणे गरजेचे आहे. या कार्यशाळेच्या माध्यमातून तळागाळाच्या जनतेपर्यंत विकासकामे पोहचत आहेत. ...
महसूल प्रशासनाने जाहीर केलेली पैसेवारी ही चुकीची असून ती दुरुस्त करण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी काँग्रेसच्या वतीने आज तहसीलदारांच्या दालनात ठिय्या मांडण्यात आला. ...
सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेसची सभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष देवानंद लुडबे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत वाढत्या महागाई विरोधात ११ आॅक्टोबरला जिल्ह्यात मध्यवर्ती ठिकाणी आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे ठरविण्यात आले. ...