देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
राज्यात गेल्या साडेचार वर्षांत गुंतवणूक नाही, कारखाने नाहीत, रोजगार नाही़ गेल्या ४५ वर्षांत जेवढी नाही तेवढी यावेळी बेरोजगारी वाढली आहे़ भाजपाच्या काळात नांदेडचा विकास खुंटला असून काँग्रेसची सत्ता आल्यास नांदेडातच रोजगार निर्माण करण्यात येईल़ ...
परदेशी सरकार नको म्हणून सोनिया गांधी यांना विरोध शरद पवारांनी केला आणि निवडणुकीनंतर पुन्हा निर्लज्जासारखं सत्तेसाठी काँग्रेसच्या मागे धावले असा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला ...
अर्ज दाखल करताना स्मृती इराणींनी त्यांची मागील चूक सुधारली हा काय गुन्हा नव्हे, असे म्हणत भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी स्मृती इरणींचे समर्थन केले. ...