देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
राहुल गांधी यांनी आपल्याला वाराणसी येथून निवडणूक लढविण्याच्या सूचना केल्यास आपण तयार असल्याचे प्रियंका गांधी यांनी म्हटले. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. ...
काँग्रेसने जाहीर केलेल्या यादीत दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दिक्षित यांच्यासह जे.पी. अग्रवाल, अरविंदर सिंह लवली, अजय माकनसह दिग्गजांचे नावे सामील आहेत. ...
आम्हाला विरोध असेल, तर मग काँग्रेस-राष्ट्रवादीवाले गुणांचे पुतळे आहेत का, असा सवाल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता रविवारी धारावीच्या प्रचारसभेत केला. ...