झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 13:24 IST2026-04-25T13:22:22+5:302026-04-25T13:24:05+5:30

झारखंडमधील हजारीबाग जिल्ह्यात बँक दरोड्याची एक खळबळजनक घटना समोर आली आहे.

hazaribagh bank robbery bank of maharashtra 7 crore gold cash loot | झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास

फोटो - आजतक

झारखंडमधील हजारीबाग जिल्ह्यात बँक दरोड्याची एक खळबळजनक घटना समोर आली आहे. बरही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हजारीबाग रोडवर असलेल्या 'बँक ऑफ महाराष्ट्र'मध्ये चार जण शिरले आणि त्यांनी अवघ्या १० मिनिटांत तब्बल ७ कोटींचं सोनं आणि ५ लाखांची रोकड घेऊन पसार झाले. पोलीस तपासात असं समोर आलं आहे की, हा संपूर्ण कट पूर्वनियोजित होता. 

दोन जण सुरुवातीला ग्राहक बनून बँकेत आले आणि त्यांनी अकाऊंट सुरू करण्याचा बहाणा केला. काही वेळातच त्यांचे इतर दोन साथीदारही बँकेत दाखल झाले. त्यानंतर चौघांनी अचानक शस्त्र काढून बँक कर्मचाऱ्यांना धमकावण्यास सुरुवात केली. बँकेत शिरताच त्यांनी कर्मचारी आणि उपस्थित ग्राहकांना एका ठिकाणी गोळा केलं. शस्त्रांचा धाक दाखवून सर्वांना घाबरवण्यात आलं आणि विरोध केल्यास गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिली गेली. दहशत निर्माण करण्यासाठी त्यांनी बँक मॅनेजरला मारहाणही केली.

फिल्मी स्टाईल दरोडा

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हा संपूर्ण दरोडा फक्त १० मिनिटांत टाकला गेला. ते दुपारी ३:१९ वाजता बँकेत शिरले आणि ३:२९ वाजेपर्यंत लूट करून बाहेर पडले. कोणाला काही समजण्यापूर्वीच हे दरोडेखोर लॉकरमध्ये ठेवलेले सोनं तसेच कॅश काउंटरमधील रोकड घेऊन पळाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली. बँकेतील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासलं जात आहेत. 

७ कोटींचे सोनं आणि ५ लाखांची लूट

बँक कर्मचाऱ्यांनी सांगितलं की, खातं सुरू करण्याच्या बहाण्याने दोन दरोडेखोर आधी आले आणि त्यानंतर मागून इतर दोघे आले. त्यांच्याकडे छोटी शस्त्रं होती. शस्त्राच्या जोरावर त्यांनी कर्मचाऱ्यांना बाजूला होण्यास सांगितलं आणि मॅनेजरला मारहाण केली. अजित कुमार विमल यांनी सांगितले की, चार दरोडेखोरांनी ही घटना घडवून आणली आहे. परिसरात नाकेबंदी करण्यात आली असून ७ कोटींचे सोनं आणि ५ लाखांची लूट झाल्याची माहिती मिळत आहे. पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
 

Web Title : झारखंड में बैंक में बड़ी डकैती: करोड़ों का सोना और नकदी लूटी

Web Summary : झारखंड के हजारीबाग में, लुटेरों ने बैंक ऑफ महाराष्ट्र की शाखा पर धावा बोलकर दस मिनट में 7 करोड़ रुपये का सोना और 5 लाख रुपये नकद चुरा लिए। ग्राहकों के रूप में भेस बदलकर, उन्होंने कर्मचारियों और ग्राहकों को हथियारों से धमकाया, भागने से पहले प्रबंधक पर हमला किया। पुलिस नियोजित डकैती की जांच कर रही है।

Web Title : Massive Bank Robbery in Jharkhand: Crores in Gold and Cash Stolen

Web Summary : In Jharkhand's Hazaribagh, robbers stormed a Bank of Maharashtra branch, stealing ₹7 crore in gold and ₹5 lakh in cash within ten minutes. Disguised as customers, they threatened staff and customers with weapons, assaulting the manager before escaping. Police are investigating the planned heist.