देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
प्रतिस्पर्धी भाजपकडून अध्यक्ष उपाध्यक्षपदासाठी दाखल करण्यात आलेले दोन्ही अर्ज मागे घेण्यात आल्यामुळे महाविकास आघाडीच्या अध्यक्ष उपाध्यक्षांची अविरोध निवड झाली आहे. ...
महाविकास आघाडीत सर्वांना समावून घेण्याचे आव्हान आहे. आपणही कधी अपेक्षा केली नव्हती. त्यामुळे लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कामाला लागू असंही प्रणिती यांनी सांगितले. ...