हिंसाचारामुळे बांगलादेशातील नागरिक भयभीत झाले आहेत. त्यापैकी शेकडो नागरिक कुचबिहारलगतच्या सीमेवर बांगलादेशच्या हद्दीत गोळा झाले. सीमेवर उभारलेले कुंपण ओलांडून भारताच्या हद्दीत घुसखोरी करण्याचा त्यांनी केेलेला प्रयत्न बीएसएफने हाणून पाडला. ...
हजारो बांगलादेशी नागरिक सीमेवर जमा झाल्याचे व भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती मिळताच बीएसएफचे कमांडंट अजय शुक्ला तसेच बिहारमधील इस्लामपूर येथील पोलिस घटनास्थळी पोहोचले. ...