देवगड हापूस आंब्याचे वाशी मार्केटमधील भाव घसरले असून ५ डझनी आंबा पेटीला २ ते अडीच हजार रुपये भाव आहे, तर बागायतदार पुणे, मुंबई, कोल्हापूर, सांगली व स्थानिक बाजारपेठांमध्येही आठशे ते बाराशे रुपये प्रतिडझन आंब्याची विक्री करीत आहेत. ...
उष्मा वाढल्याने आंबा तयार होण्याला गती आली आहे. त्यामुळे वाशी (नवी मुंबई) बाजारात आंब्याची आवक वाढली आहे. रविवारी आंब्याच्या तब्बल ३६ हजार पेट्या विक्रीसाठी वाशी बाजारात गेल्या. ...
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंब्याची आवक वाढू लागली आहे. मार्केटमध्ये हापूस डझनच्या दराने विकला जात आहे; परंतु प्रशासन बाजारभाव किलोच्या भावामध्ये प्रसिद्ध करत आहे. ...
कांदा निर्यातबंदी ३१ मार्च २४ पर्यंत आहे. त्यानंतर ती हटून कांद्याचे बाजारभाव वधारणार का? अशी अपेक्षा कांदा निर्यातदारांनी केंद्राला दिलेल्या पत्रामुळे निर्माण झाली आहे. दरम्यान एनईसीएलने केलेला कांदा घोटाळाही आता समोर येत आहे. ...