Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्याFOLLOW
Amit shah, Latest Marathi News
अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला. अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. Read More
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री अहमदाबादमध्ये भाजपाध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली.अमित शहांची भेट घेऊन फडणवीस बाहेर पडताच त्यांना पत्रकारांनी गराडा घातला आणि पश्नांची सरबत्ती सुरु केली. ...
जीएसजी आणि नोटाबंदीच्या निर्णयांमुळे केंद्रातील मोदी सरकार विरोधकांच्या टीकेचे लक्ष्य होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय मानांकन संस्था मूडीजने भारताच्या वाढवलेल्या पतमानांकनामुळे मोदी सरकारला दिलासा मिळाला आहे. ...
शत्रुघ्न सिन्हा बोलले आहेत की, भाजपा तेव्हाच लोकांच्या अपेक्षांवर उतरु शकते जेव्हा ते 'वन मॅन शो' आणि 'टू मॅन आर्मी'च्या चक्रव्यूहातून बाहेर पडेल. त्यांनी सांगितलं की, 'देशातील तरुण, शेतकरी आणि व्यापारी भाजपा सरकारच्या धोरणांमुळे नाराज आहे'. ...
हार्दिक पटेलने काँग्रेसला आपली भूमिका मांडण्यासाठी 3 नोव्हेंबरपर्यतचा वेळ दिला आहे. यासोबतच काँग्रेसला चेतावणी देताना सुरतमध्ये जे अमित शाह यांच्यासोबत झालं तेच काँग्रेसससोबत होईल असं सांगितलं आहे. ...
नरेंद्र पटेल यांनी भाजपाला रामराम ठोकल्यानंतर आता निखिल सवानी यांनीही भाजपाची साथ सोडली आहे. आज सकाळी निखिल सवानी यांनी पत्रकारांशी बातचीत करताना भाजपाला सोडचिठ्ठी देत असल्याचं जाहीर केलं. ...
अमित भार्इंनी मराठीभूमीत खास दिवाळी गिफ्ट आणि फक्त खास माणसांसाठीच पाठवल्याची बातमी वा-यासारखी पसरली. चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या अनेक झेलक-यांची धांदल सुरू झाली. ...
भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचे पुत्र जय शहा यांच्या कंपनीच्या वाढलेल्या संपत्तीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी चूप का आहेत, असा सवाल करीत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींच्याच भाषेत उपरोधिक टोला लगावला आहे. ...