Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > रुपयाची ऐतिहासिक घसरण; डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतच्या नीचांकी स्तरावर, जाणून घ्या महत्त्वाची कारणं

रुपयाची ऐतिहासिक घसरण; डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतच्या नीचांकी स्तरावर, जाणून घ्या महत्त्वाची कारणं

Rupees All Time Low: भारतीय रुपयाची घसरण थांबण्याचं नाव घेत नसून मंगळवारी सुरुवातीच्या व्यवहारात रुपया ३५ पैशांनी कमकुवत झाला. काय आहेत रुपयाच्या घसरणीमागची कारणं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 10:25 IST2026-05-12T10:22:36+5:302026-05-12T10:25:31+5:30

Rupees All Time Low: भारतीय रुपयाची घसरण थांबण्याचं नाव घेत नसून मंगळवारी सुरुवातीच्या व्यवहारात रुपया ३५ पैशांनी कमकुवत झाला. काय आहेत रुपयाच्या घसरणीमागची कारणं?

Historical fall of rupee lowest level ever against dollar know the important reasons | रुपयाची ऐतिहासिक घसरण; डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतच्या नीचांकी स्तरावर, जाणून घ्या महत्त्वाची कारणं

रुपयाची ऐतिहासिक घसरण; डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतच्या नीचांकी स्तरावर, जाणून घ्या महत्त्वाची कारणं

Rupees All Time Low: भारतीय रुपयाची घसरण थांबण्याचं नाव घेत नसून मंगळवारी सुरुवातीच्या व्यवहारात रुपया ३५ पैशांनी कमकुवत झाला. यामुळे रुपया आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी म्हणजेच ९५.६३ या स्तरावर पोहोचला आहे. अमेरिका आणि इराणमधील वाढता तणाव आणि उभय देशांमधील कराराची शक्यता धूसर झाल्याचा परिणाम कच्च्या तेलाच्या किमतींवर झाला असून, त्याचा थेट फटका भारतीय चलनाला बसला आहे.

आंतरबँक विदेशी मुद्रा विनिमय बाजारात रुपया आज डॉलरच्या तुलनेत ९५.५७ वर उघडला आणि काही वेळातच तो ९५.६३ पर्यंत खाली घसरला. सोमवारी देखील रुपया ७९ पैशांनी घसरून ९५.२८ वर बंद झाला होता, जो त्यावेळी एक रेकॉर्ड होता. मात्र, आज तो रेकॉर्डही मोडीत निघाला आहे.

शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण; आयटी शेअर्सना मोठा फटका, सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये

जागतिक आणि देशांतर्गत बाजारातील स्थिती

डॉलरची मजबूती : सहा प्रमुख चलनांच्या तुलनेत अमेरिकन डॉलरची स्थिती दर्शवणारा 'डॉलर इंडेक्स' ०.१९ टक्क्यांनी वधारून ९८.१४ वर पोहोचलाय.

कच्चं तेल : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत 'ब्रेंट क्रूड' ऑईलची किंमत ०.८५ टक्क्यांनी वाढून १०५.१० डॉलर प्रति बॅरलवर पोहोचली. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती रुपयावरील दबाव वाढवत आहेत.

शेअर बाजार : रुपयाच्या घसरणीचं सावट भारतीय शेअर बाजारावरही पाहायला मिळालं. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ५२५.४४ अंकांनी घसरून ७५,४८९.८४ वर, तर निफ्टी १६४.५ अंकांनी घसरून २३,६५१.३५ वर आला.

विदेशी गुंतवणूक : विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) सोमवारी बाजारात मोठी विक्री केली असून, त्यांनी सुमारे ८,४३७ कोटी रुपयांचे शेअर्स विकले आहेत.

Web Title : रुपया ऐतिहासिक निचले स्तर पर; वैश्विक आर्थिक दबाव में गिरावट

Web Summary : अमेरिकी-ईरान तनाव के कारण कच्चे तेल की कीमतों पर असर पड़ने से भारतीय रुपया डॉलर के मुकाबले 95.63 के रिकॉर्ड निचले स्तर पर आ गया। मजबूत डॉलर, गिरते शेयर बाजार और विदेशी निवेशकों द्वारा भारी बिकवाली ने रुपये की स्थिति को और कमजोर कर दिया।

Web Title : Rupee Plummets to Record Low Amidst Global Economic Pressures

Web Summary : The Indian rupee hit a record low of 95.63 against the dollar due to rising US-Iran tensions impacting crude oil prices. A strong dollar, falling stock markets, and heavy selling by foreign investors further weakened the rupee's position.