रविवारी सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २६६ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाºया रुग्णांची संख्या आता ३३५६ इतकी झाली आहे. ...
वाघापूर शिवारात शेतक-यांनी एका परप्रांतीय युवकाला शेतातील फ्लावर चोरल्याने बेदम मारहाण करण्यात आली. त्याच्यावर पोलिसांनी गुन्हाही दाखल केला. दरम्यान, हा युवक संगमनेर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेला असता त्यास पोलिसांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन सा ...
अहमदनगर जिल्ह्यात रविवारी (६ सप्टेंबर) तब्बल ६३८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २१ हजार ७१० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८६.४४ टक्के इतके झाले आहे. ...
नागरिक व कामगारांच्या प्रश्नी अनेकदा पत्र पाठवूनही साई संस्थानच्या तदर्थ समितीचे अध्यक्ष वेळ देत नाहीत. त्यामुळे त्यांची भेट मिळविण्यासाठी हजारो कामगार व ग्रामस्थांना घेवून ते बसत असलेल्या नगरच्या जिल्हा न्यायालयाच्या आवारात धरणे धरणार असल्याचा इशारा ...
सलग दोन दिवसात राजूरमध्ये २१ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. खबरदारी म्हणून राजूर ग्रामपंचायतीने गुरुवारपर्यंत(१० सप्टेंबर) सलग पाच दिवस राजूर गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सरपंच गणपतराव देशमुख यांनी सांगितले. ...
शेडगाव येथे विनापरवाना खते साठवणूक करणे व विक्री करणे या विरोधात सिद्धीविनायक कृषी सेवा केंद्राचे चालक विजय रघुनाथ पवार (रा. जलालपूर, ता.कर्जत) याच्या विरोधात कृषी विभागाने गुन्हा दाखल केला आहे. सुमारे ४ लाख ५६ हजार किंमतीचे खते कीटकनाशके जप्त केले ...
सरकारी शाळेत ज्ञानदानाचे काम करणा-या शिक्षकाला चक्क अठरा वर्षे शासकीय पगाराची वाट पाहावी लागली. कोतूळ येथील शासकीय आश्रमशाळेत शिक्षक म्हणून रोजंदारीवर काम करणाºया सुरेश देवराम गिते हे शासनाच्या अनास्थेचा अनुभव घेत आहेत. ...
शेवगाव तालुक्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नेमणूक करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश गटविकास अधिकारी महेश डोके यांनी २३ आॅगस्ट रोजी काढले आहेत. नियुक्ती केलेल्या सर्व अधिका-यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले आहेत. ...