Shubman Gill Equal Sachin Tendulkar And Virat Kohli Record : इंडियन प्रीमियर लीगच्या १९ व्या हंगामात गुजरात टायटन्सला कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध २९ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, या सामन्यात कर्णधार शुभमन गिलने दमदार अर्धशतकी खेळीसह खास विक्रमाला गवसणी घातली. आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील सुरुवातीच्या सामन्यात शुभमन गिल धावांसाठी संघर्ष करताना दिसला. पण त्यानंतर त्याने दमदार कमबॅक करत सातत्यपूर्ण आपल्या फलंदाजीतील सर्वोत्तम नजराणा पेश केला. गिल आता ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आपलाच सलामीचा जोडीदार साई सुदर्शन पाठोपाठ दुसऱ्या स्थानावर पोहोचला असून कर्णधाराच्या रुपात त्याने सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्या खास विक्रमाशी बरोबरी साधली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सलग दुसऱ्या हंगामात कर्णधाराच्या रुपात ५०० पेक्षा अधिक धावा
शुभमन गिलने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यातील ८५ धावांच्या खेळीसह आतापर्यंत ५५२ धावा केल्या आहेत. यासह तो IPL इतिहासात कर्णधाराच्या रुपात सलग दोन किंवा अधिक हंगामांत ५०० पेक्षा अधिक धावा करणारा फक्त पाचवा खेळाडू ठरला आहे. तो सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली या दिग्गजांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे.
षटकारांची ‘बरसात’! IPL मध्ये अशी कामगिरी करणारा फिन ॲलन क्रिकेट विश्वातील पहिलाच फलंदाज
कर्णधाराच्या रुपात डेविड वॉर्नरसह KL राहुलनं सोडलीये खास छाप
या यादीत डेविड वॉर्नर आणि केएल राहुल संयुक्तपणे अव्वलस्थानी आहेत. वॉर्नरने २०१५, २०१६ आणि २०१७ या सलग तीन हंगामांत ५०० पेक्षा अधिक धावा केल्या होत्या. तर केएल राहुलने २०२०, २०२१ आणि २०२२ मध्ये हा पराक्रम केला होता.
IPL मध्ये सलग हंगामांत ५०० पेक्षा अधिक धावा करणारे कर्णधार
- डेविड वॉर्नर – ३ वेळा (२०१५, २०१६, २०१७)
- केएल राहुल – ३ वेळा (२०२०, २०२१, २०२२)
- सचिन तेंडुलकर – २ वेळा (२०१०, २०११)
- विराट कोहली – २ वेळा (२०१५, २०१६)
- शुभमन गिल – २ वेळा (२०२५, २०२६)
ऑरेंज कॅप जिंकण्याची मोठी संधी
शुभमन गिलला यंदाच्या हंगामात ऑरेंज कॅप जिंकण्याची मोठी संधी आहे. या शर्यतीत त्याची सहकराी साई सुदर्शनसोबत तगडी स्पर्धा आहे. साई सुदर्शन या यादीत ५५४ धावांसह अव्वलस्थानी आहे, गिल ५५२ धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. गिलने यंदाच्या हंगामात १२ डावांत ४६ च्या सरासरीने ५५२ धावा केल्या असून त्याच्या बॅटमधून ५ अर्धशतकेही पाहायला मिळाली आहेत.