सखी: बाल्कनीतही लावता येईल तमालपत्राचं झाड, वाचा A to Z माहिती
तमालपत्राचे रोप लावताना माती कशी असावी, खत कोणते द्यावे आणि कडक उन्हात त्याची काळजी कशी घ्यावी, याबद्दल अनेकांच्या मनात शंका असतात. जर आपण बागेत तमालपत्राचे रोप लावत असू तर A to Z माहिती पाहूया, ज्यामुळे आपल्याला वर्षभर घरचा शुद्ध तमालपत्र आणि फ्रेश मसाल्याची चव चाखता येईल.
छत्रपती संभाजीनगर: अनास्था! छ. संभाजीनगर-नागपूर रेल्वे नाही, २४ तास ११४ ट्रॅव्हल्सचेच राज्य.
छ. संभाजीनगरहून नागपूरसाठी थेट रेल्वे नाही; प्रवासी महागड्या खाजगी ट्रॅव्हल्सवर अवलंबून. दररोज ११४ ट्रॅव्हल्स बस धावतात. बंद केलेल्या गाड्यांमुळे स्थिती गंभीर, राजकीय अनास्था उघड. रेल्वे मार्गांची मागणी वाढली.
धाराशिव: जात पंचायतीचा अजब न्याय: देव कोपला, मायलेकरांना मारहाण, लाखोंचा दंड
धाराशिवमध्ये जात पंचायतीने एका महिलेस व मुलास देव कोपल्याच्या कारणावरून मारहाण केली, तसेच २.५५ लाखांचा दंड ठोठावला व ६० हजार रुपये उकळले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
बीड: बीड एसीबीची कारवाई: महावितरणच्या महिला अभियंता लाच घेताना अटकेत
बीडमध्ये, सौर ऊर्जा प्रकल्पाला मंजुरी देण्यासाठी १८ हजार रुपयांची लाच घेताना महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला एसीबीने रंगेहाथ पकडले. या अटकेमुळे महावितरण विभागात खळबळ उडाली आहे.
पुणे: पुण्यात थरार..! आप्पा बळवंत चौकात धडक, बस थेट दुकानात;सुदैवाने जीवितहानी नाही
पुणे - शहरातील मध्यवर्ती व गजबजलेल्या आप्पा बळवंत चौकात आज दुपारी एक धक्कादायक अपघात घडला. भरधाव वेगात येणारी पीएमपीएल बस अचानक नियंत्रण सुटून थेट एका दुकानात घुसली. या अपघातात दुकानाचे मोठे नुकसान झाले असून, लाखो रुपयांची हानी झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
व्यापार: पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा
पश्चिम आशियातील वाढत्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँके 'वेट अँड वॉच' या भूमिकेत असल्याचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी स्पष्ट केले आहे. अमेरिकेतील प्रिन्स्टन विद्यापीठात एका कार्यक्रमात बोलताना गव्हर्नर मल्होत्रा यांनी सांगितले की, पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाईवर दुय्यम परिणाम होऊ शकतात. त्यामुळे धोरणात्मक निर्णय घेताना सावध भूमिका आवश्यक आहे.
परभणी: शेतशिवारात अनोळखी जोडप्याचा मृत्यू, गूढ वाढले!
परभणीतील पिंपळगाव ठोंबरे येथे एका झाडाला अनोळखी जोडप्याचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळले. दुर्गंधीमुळे प्रकार उघडकीस, अंदाजे आठवडाभरापूर्वीची घटना. आत्महत्या की घातपात? पोलीस तपास करत आहेत, मृतांची ओळख पटलेली नाही.
छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा: रबी हंगाम वाया, ९० दिवसांत २१७ शेतकऱ्यांची आत्महत्या
मराठवाड्यात अवकाळी पाऊस आणि कर्जामुळे झालेल्या पीक नुकसानीमुळे तीन महिन्यांत २१७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मार्चमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले. शासकीय मदत वितरीत केली जात आहे, परंतु अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. गेल्या वर्षी १,१२९ आत्महत्या झाल्या.
व्यापार: सेन्सेक्स ७५३ अंकांनी वाढला, तर निफ्टी २४,५७६ अंकांवर बंद; बँकिंग शेअर्स ठरले मार्केटचे ‘हिरो’
शेअर बाजारात आज जबरदस्त तेजी दिसून आली. सकाळी बाजार सुरू होताच पकडलेला वेग, दिवसाच्या अखेरपर्यंत कायम होता. 'निफ्टी' २११ अंकांनी किंवा ०.८७ टक्क्यांनी वाढून २४,५७६ अंकांवर बंद झाला. तर 'सेन्सेक्स' ०.९६ टक्क्यांनी, किंवा ७५३ अंकांनी वधारून ७९,२७३ अंकांवर बंद झाला. या तेजीमध्ये बँकिंग क्षेत्रातील शेअर्सने बाजाराला मोठा आधार दिला.
छत्रपती संभाजीनगर: टॅक्स पेपर फुटला: विद्यापीठाकडून मास्टरमाईंड शोध, गुन्हा दाखल होणार
बी.कॉमचा ‘डायरेक्ट टॅक्स’ पेपर हतनूर महाविद्यालयातून फुटला. ४ मे रोजी पुनर्परीक्षा, केंद्र कायमस्वरूपी बंद. विद्यापीठाच्या तपासानंतर कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल.
व्यापार: डिफेन्स स्टॉकने केले मालामाल; सहा वर्षात ₹१ लाखाचे झाले ₹७० लाख, आजच्या व्यवहारात ११% वाढ
डिफेन्स क्षेत्रातील ZEN Technologies Ltd च्या शेअर्समध्ये गेल्या काही वर्षांत जबरदस्त तेजी पाहायला मिळाली आहे. अवघ्या ६ वर्षांत या शेअरची किंमत ₹२६ वरून थेट ₹१८२५ पर्यंत पोहोचली. एखाद्या गुंतवणूकदाराने सहा वर्षांपूर्वी यात ₹१ लाख गुंतवले असतील, तर त्याला आज तब्बल ₹७० लाखांपर्यंतचा परतावा मिळेल.
पिंपरी -चिंचवड: पिंपरी: हप्ता थकल्याने शेतकऱ्याला चाकून मारहाण, तिघे अटकेत
पिंपरी-चिंचवडमध्ये गाडीचे हप्ते थकल्याने रिकव्हरी एजंट्सने एका शेतकऱ्यावर हल्ला केला. यात शेतकऱ्याला चाकून मारण्यात आले. एमआयडीसी भोसरी पोलिसांनी या प्रकरणी तीन एजंटना अटक केली आहे. आरोपींनी शेतकऱ्याला शिवीगाळ करत गाडीची काच फोडून वार केले.
पिंपरी -चिंचवड: Crime News : पिंपरीत राष्ट्रवादी नगरसेविकेच्या पतीला मारहाण अन् जीवे मारण्याची धमकी
पिंपरी : राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या नगरसेविका सविता आसवानी यांचे पती धनराज आसवानी यांना एका दुकानाचे मालक व त्याच्या साथीदारांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. ही घटना अतिक्रमणविरोधी पथकाच्या कारवाईदरम्यान रविवारी (दि. १९) रात्री साडेसातच्या सुमारास घडली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापले होते. याबाबत रात्री उशिरा पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
व्यापार: शेअर असावा तर असा; ₹२.८६ कोटींचे झाले तब्बल ₹१००, अल्पावधीत दिला 'छप्परफाड' रिटर्न
फक्त मोठ्याच नाही, तर लहान/मध्यम कंपन्यांमधील गुंतवणुकीतून मोठे परतावे मिळू शकतात, याचे ताजे उदाहरण समोर आले आहे. Monolithic India या कंपनीत केलेल्या प्री-IPO गुंतवणुकीने प्रमोटर प्रभात टेकरीवाल यांना प्रचंड फायदा करून दिला आहे. त्यांच्या सुमारे ₹२.८६ कोटींच्या गुंतवणुकीचे मूल्य आज जवळपास ₹१०० कोटींवर पोहोचले आहे.
व्यापार: Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
जगातील सर्वात मूल्यवान टेक कंपन्यांपैकी एक असलेल्या Apple मध्ये खांदेपालट झाले आहे. कंपनीचे विद्यमान CEO टिम कुक लवकरच पद सोडणार असून त्यांच्या जागी जॉन टर्नस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. टर्नस येत्या १ सप्टेंबर २०२६ पासून CEO पदाची जबाबदारी स्वीकारतील. तसेच, मागील १५ वर्षांपासून CEO पदावर कार्यरत असलेल्या टिम कुक यांना ‘एक्झिक्युटिव्ह चेअरमन’ पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
नांदेड: भरधाव कार शेतात घुसून महिलेचा मृत्यू; परिसरात हळहळ
अर्धापूर (नांदेड) येथे भरधाव कार थेट शेतात घुसल्याने ३८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. मंगलबाई शिंदे नामक महिला शेतात विश्रांती घेत असताना हा अपघात झाला. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पुणे: हिंजवडी आयटी पार्कमध्ये नवा वाद..! ‘त्या‘ कंपनीच्या विश्रांती कक्षाची चौकशी करा
पुणे - नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पुण्यातील आयटी हब हिंजवडी परिसरातील बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये विश्रांती कक्ष वापराबाबत गंभीर तक्रारींची दखल घेतली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी पुणे पोलीस आयुक्तांना पत्र लिहून तातडीने चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.
व्यापार: वर्षाला ₹७०,००० गुंतवा अन् मॅच्युरिटीवर मिळवा तब्बल ₹१८,९८,४९८; कोणती आहे योजना?
PPF Investment : तुम्ही दीर्घकालीन आणि सुरक्षित गुंतवणुकीसाठी पर्याय शोधत असाल, तर Public Provident Fund (PPF) हा एक विश्वासार्ह पर्याय आहे. केंद्र सरकारच्या या योजनेत गुंतवणूक सुरक्षित राहते आणि 'गॅरंटेड' परतावा मिळतो. सध्या या योजनेवर सुमारे ७.१% व्याजदर दिला जात आहे. PPF ही १५ वर्षांची दीर्घकालीन गुंतवणूक योजना आहे. या कालावधीनंतर गुंतवणूकदार संपूर्ण रक्कम काढू शकतो. यामध्ये वार्षिक किमान गुंतवणूक फक्त ₹५०० आहे, तर कमाल गुंतवणूकीची मर्यादा ₹१,५०,००० (प्रति आर्थिक वर्ष) आहे. तुम्ही मासिक किंवा वार्षिक पद्धतीनेही गुंतवणूक करू शकता.
जालना: भ्रष्टाचार विरुद्ध कारवाई: जालना कृषी अधिकारी, बीड ग्रामविकास अधिकारी जाळ्यात.
जालन्यात कृषी अधिकारी लाच घेताना पकडले; योजना लाभासाठी मागणी. बीडमध्ये ग्रामविकास अधिकाऱ्यांवर गुन्हा; एसीबीच्या कारवाईने महसूल, ग्रामविकास विभागात खळबळ.
व्यापार: २०३० पर्यंत पेट्रोल-डिझेलची चिंता मिटली; रशियन कंपन्यांबाबत भारताचा मोठा निर्णय...
Russian Oil: अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावामुळे होर्मुझ सामुद्रधुनीतून होणारा तेल आणि गॅसचा पुरवठा खंडित झाला आहे. या पार्श्वभूमीवर आता भारताने ऊर्जा सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा आणि धोरणात्मक निर्णय घेतला आहे. यामुळे किमान २०३० पर्यंत भारताचा तेल पुरवठा सुरळीत राहू शकतो.
आंतरराष्ट्रीय: चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा
होर्मुझ सामुद्रधुनीत अमेरिकेची नाकेबंदी तोडत इराणचे जहाज बंदराकडे निघाले होते. अमेरिकेच्या नौदलाने ताब्यात घेतलेल्या या जहाजामध्ये मिसाईलसाठी वापरली जाणारी रसायने मिळाली आहेत. ही रसायने चीनने पाठवली होती, असा दावा ट्रम्प यांच्या पक्षाच्या नेत्या आणि अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हेली यांनी केला आहे.
व्यापार: लग्नसराईपूर्वी सोन्या-चांदीत घसरण; जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर...
Gold Silver Price Today 21 April: लग्नाचा हंगाम जवळ आला आहे. या पार्श्वभूमीवर, सोन्या-चांदीच्या दरात आजही(दि.२१) घसरण दिसून येत आहे. चांदीच्या दरात सुमारे ₹१,७५० ची घट झाली. तर, देशातील कमोडिटी बाजार Multi Commodity Exchange (MCX) वर ५ जून २०२६ एक्सपायरी असलेले गोल्ड फ्युचर्स सुमारे १९० रुपयांनी घसरले.
व्यापार: शेअर बाजार वधारला! सेन्सेक्स ७९,००० पार, तर निफ्टी २४,५०० च्या वर
भारतीय शेअर बाजाराची मंगळवारीही(दि.२१) दणक्यात सुरुवात झाली. सकाळच्या सत्रात सोन्सेक्स ४९५ अंकांनी वाढून ७९,०१५ वर पोहोचला, तर निफ्टी-50 ने १०० अंकांची झेप घेत २४,५०० चा टप्पा ओलांडला. एनएसईवरदेखील सुमारे २,२४१ शेअर्स हिरव्या निशाणावर होते, तर ६२७ शेअर्स घसरणीत होते. याशिवाय १०० शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचले, तर ७१ शेअर्समध्ये अपर सर्किट लागले.
फिल्मी: जिनिलियाचं रितेशवरील प्रेम पाहून भारावली भाग्यश्री, 'राजा शिवाजी' सेटवरचा किस्सा सांगत म्हणाली...
'राजा शिवाजी' या ऐतिहासिक चित्रपटाच्या ट्रेलरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. काल ट्रेलर लाँच सोहळ्यात राजमाता जिजाऊंची भूमिका साकारणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्रीनं रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्या केमिस्ट्रीबद्दल एक अतिशय गोड किस्सा शेअर केला, जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
क्रिकेट: IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
तिलक वर्माच्या विक्रमी जलद शतकी खेळीनंतर अश्वनी कुमार याने केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर मुंबई इंडियन्सच्या संघाने पराभवाची मालिका खंडीत करत अखेर यंदाच्या हंगामातील दुसरा विजय नोंदवला. दुसऱ्या बाजूला अहमदाबादच्या घरच्या मैदानात २०० धावांचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सवर ९९ धावांनी पराभवाची नामुष्की ओढावली. मुंबई इंडियन्सच्या संघाने विक्रमी विजयासह पाच सामन्यानंतर पहिल्यांदाच गुजरात टायटन्सला घरच्या मैदानात मात दिली.
क्रिकेट: Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
Tilak Varma Maiden IPL Hundred : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरील गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाला संकटातून बाहेर काढताना तिलक वर्मानं नाबाद आणि विक्रमी शतकी खेळी साकारली. आयपीएल कारकिर्दीतील त्याचे हे पहिले शतक ठरले. युवा बॅटरनं ४५ चेंडूत ८ चौकार आणि ७ षटकाराच्या मदतीने १०१ धावांची नाबाद खेळी केली. या खेळीसह त्याने मुबई इंडियन्सकडून जलद शतकी खेळी करणाऱ्या सनथ जयसूर्याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर: ऐतिहासिक शहराचे ६ वेळा नामांतर, एकदा नामविस्तार!
छत्रपती संभाजीनगर, पूर्वीचे औरंगाबाद, राजतडाग ते खडकी असे सहा वेळा नामांतर आणि एकदा नामविस्तार असलेला समृद्ध इतिहास आहे. एकेकाळी सातवाहन आणि यादव यांची राजधानी, हे विविध शासनांचे प्रतिबिंब आहे.
व्यापार: सकाळी दमदार सुरुवात, मात्र दिवसाखेर किरकोळ वाढ; गुंतवणूकदारांचे ७१ हजार कोटी स्वाहा...
आज(२० एप्रिल) रोजी भारतीय शेअर बाजारात दिवसभर चढ-उताराचे वातावरण पाहायला मिळाले. मात्र, दिवसाखेर प्रमुख निर्देशांकांमध्ये किरकोळ वाढ पाहायला मिळाली. BSE Sensex २६.७६ अंकांनी (०.०३%) वाढून ७८,५२०.३० वर बंद झाला, तर NSE Nifty 50 ११.३० अंकांनी (०.०५%) वाढून २४,३६४.८५ वर स्थिरावला.
व्यापार: जर्मनीसोबत ₹९०,००० कोटींचा संरक्षण करार; भारतासाठी का महत्वाचा आहे Project-75I..?
Rajnath Singh Germany Visit: भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह मंगळवारपासून जर्मनीच्या तीन दिवसीय अधिकृत दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्याचा मुख्य उद्देश भारत आणि जर्मनीमधील संरक्षण भागीदारी अधिक मजबूत करणे हा आहे.
छत्रपती संभाजीनगर: चीज अस्सल की कृत्रिम? मेनूवर माहिती देणे बंधनकारक!
कृत्रिम चीज वापराबाबत FDA चा महत्वाचा निर्णय. मेनूकार्डवर स्पष्ट उल्लेख करणे बंधनकारक; उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई. अधिकृत पुरवठादारांकडूनच खरेदी करावी.
व्यापार: 'आम्ही डॉलरऐवजी चिनी युआनमध्ये व्यापार करू', UAE चा अमेरिकेला इशारा
US Dollar and Chinese Yuan: अमेरिका-इराण संघर्षाची झळ आता UAE (यूएई) पर्यंत पोहोचू लागली आहे. यूएईने या तणावासाठी थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांना जबाबदार ठरवत इशारा दिला की, जर डॉलरची टंचाई निर्माण झाली, तर तेल आणि गॅस व्यवहारांसाठी चीनी युआनसह इतर चलनांचा वापर सुरू केला जाईल.