Pune accident :पुण्यात थरार..! आप्पा बळवंत चौकात धडक, बस थेट दुकानात;सुदैवाने जीवितहानी नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 17:59 IST2026-04-21T17:57:25+5:302026-04-21T17:59:12+5:30

Pune accident - या अपघातात दुकानाचे मोठे नुकसान झाले असून, लाखो रुपयांची हानी झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Pune accident Thrill in Pune Bus crashes into shop at Appa Balwant Chowk; Fortunately, no casualties | Pune accident :पुण्यात थरार..! आप्पा बळवंत चौकात धडक, बस थेट दुकानात;सुदैवाने जीवितहानी नाही

Pune accident :पुण्यात थरार..! आप्पा बळवंत चौकात धडक, बस थेट दुकानात;सुदैवाने जीवितहानी नाही

पुणे - शहरातील मध्यवर्ती व गजबजलेल्या आप्पा बळवंत चौकात  आज दुपारी एक धक्कादायक अपघात घडला. भरधाव वेगात येणारी पीएमपीएल बस अचानक नियंत्रण सुटून थेट एका दुकानात घुसली. या अपघातात दुकानाचे मोठे नुकसान झाले असून, लाखो रुपयांची हानी झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 



प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बस वेगात येत असताना अचानक चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानावर आदळली. अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, दुकानातील साहित्य पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्यामुळे व्यापाऱ्याला मोठा आर्थिक फटका बसला आहे.

नुकसानाचा आकडा लाखोंमध्ये असल्याचा दावा दुकानमालकाने केला आहे. दरम्यान, बस चालकाने प्राथमिक माहितीत ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात घडल्याचे सांगितले आहे. या दाव्याची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नसून, संबंधित यंत्रणा घटनेचा तपास करत आहेत.

Web Title : पुणे में बस दुर्घटना: बस दुकान में घुसी, कोई हताहत नहीं

Web Summary : पुणे के आप्पा बळवंत चौक के पास एक पीएमपीएल बस अनियंत्रित होकर एक दुकान में जा घुसी। दुकान को काफी नुकसान हुआ, लेकिन सौभाग्य से कोई घायल नहीं हुआ। चालक का दावा है कि ब्रेक फेल हो गया था; जांच जारी है।

Web Title : Pune Bus Accident: Bus Crashes into Shop, No Casualties Reported

Web Summary : A PMPL bus in Pune crashed into a shop near Appa Balwant Chowk after the driver lost control. The shop sustained significant damage, but fortunately, no one was injured. The driver claims brake failure; investigation ongoing.