Crime News : गाडीचे हप्ते थकल्याच्या कारणावरून शेतकाऱ्याला चाकूने मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 15:51 IST2026-04-21T15:48:48+5:302026-04-21T15:51:05+5:30
Crime News - आपल्या चारचाकी गाडीतून घरी जात असताना संशयितांनी त्यांची दुचाकी आडवी लावून गाडी थांबवली.

Crime News : गाडीचे हप्ते थकल्याच्या कारणावरून शेतकाऱ्याला चाकूने मारहाण
पिंपरी : मोशी येथे गाडी अडवून हप्ते न भरल्याच्या कारणावरून एका व्यक्तीला चाकूने मारहाण करून जखमी करण्यात आले. ही घटना रविवारी (दि. १९ एप्रिल) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास शिवाजीवाडी चौक, मोशी येथे घडली.
एमआयडीसी भोसरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप सोपान कड (वय ३८, संतोषनगर, वाकी बुद्रुक) यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी प्रकाश तानाजी जाधव (वय २५, भोसरी), दत्ता पुरुषोत्तम कल्याणी (वय ३०, भोसरी) आणि सूरज तुकाराम कुसाळकर (वय २५, चिंचवड) या तीन रिकव्हरी एजंटना अटक केली आहे. फिर्यादी आपल्या चारचाकी गाडीतून घरी जात असताना संशयितांनी त्यांची दुचाकी आडवी लावून गाडी थांबवली.
गाडीचे हप्ते का भरले नाहीत, या कारणावरून त्यांनी शिवीगाळ केली. त्यानंतर गाडीची काच फोडून फिर्यादीच्या उजव्या दंडावर चाकूने वार करून त्यांना जखमी केले.