Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >गुंतवणूक > वर्षाला ₹७०,००० गुंतवा अन् मॅच्युरिटीवर मिळवा तब्बल ₹१८,९८,४९८; कोणती आहे योजना? जाणून घ्या...

वर्षाला ₹७०,००० गुंतवा अन् मॅच्युरिटीवर मिळवा तब्बल ₹१८,९८,४९८; कोणती आहे योजना? जाणून घ्या...

PPF Investment : या योजनेवर आयकर कायद्यातील Section 80C अंतर्गत करसवलत मिळते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 12:59 IST2026-04-21T12:52:51+5:302026-04-21T12:59:57+5:30

PPF Investment : या योजनेवर आयकर कायद्यातील Section 80C अंतर्गत करसवलत मिळते.

PPF Investment: Invest ₹70,000 per year and get a whopping ₹18,98,498 on maturity; What is the plan? Find out | वर्षाला ₹७०,००० गुंतवा अन् मॅच्युरिटीवर मिळवा तब्बल ₹१८,९८,४९८; कोणती आहे योजना? जाणून घ्या...

वर्षाला ₹७०,००० गुंतवा अन् मॅच्युरिटीवर मिळवा तब्बल ₹१८,९८,४९८; कोणती आहे योजना? जाणून घ्या...

PPF Investment : तुम्ही दीर्घकालीन आणि सुरक्षित गुंतवणुकीसाठी पर्याय शोधत असाल, तर Public Provident Fund (PPF) हा एक विश्वासार्ह पर्याय आहे. केंद्र सरकारच्या या योजनेत गुंतवणूक सुरक्षित राहते आणि 'गॅरंटेड' परतावा मिळतो. सध्या या योजनेवर सुमारे ७.१% व्याजदर दिला जात आहे.

PPF योजना काय आहे?

PPF ही १५ वर्षांची दीर्घकालीन गुंतवणूक योजना आहे. या कालावधीनंतर गुंतवणूकदार संपूर्ण रक्कम काढू शकतो. यामध्ये वार्षिक किमान गुंतवणूक फक्त ₹५०० आहे, तर कमाल गुंतवणूकीची मर्यादा ₹१,५०,००० (प्रति आर्थिक वर्ष) आहे. तुम्ही मासिक किंवा वार्षिक पद्धतीनेही गुंतवणूक करू शकता. 

₹७०,००० वार्षिक गुंतवणुकीवर किती परतावा?

जर एखादा गुंतवणूकदार दरवर्षी ₹७०,००० PPF मध्ये सलग १५ वर्षे गुंतवतो, तर अंदाजे परतावा पुढीलप्रमाणे मिळू शकतो:

एकूण गुंतवणूक: ₹१०,५०,०००
एकूण परतावा (व्याज): ₹८,४८,४९८
मॅच्युरिटी रक्कम: ₹१८,९८,४९८

(७.१% व्याजदराच्या आधारावर अंदाजित गणना)

खाते कुठे उघडता येते?

PPF खाते तुम्ही बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये उघडू शकता. मात्र, एका व्यक्तीच्या नावावर एकच खाते उघडता येते.

करसवलत आणि इतर फायदे

या योजनेवर आयकर कायद्यातील Section 80C अंतर्गत करसवलत मिळते. तसेच, ३ ते ६ वर्षांदरम्यान कर्ज सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय, ७ व्या वर्षापासून अंशतः पैसे काढण्याची मुभाही दिली जाते.

गुंतवणुकीची योग्य तारीख महत्त्वाची

PPF खात्यात दर महिन्याच्या ५ तारखेपूर्वी रक्कम जमा केल्यास त्या महिन्याचे पूर्ण व्याज मिळते. त्यामुळे योग्य वेळी गुंतवणूक केल्यास अधिक फायदा होऊ शकतो.

अल्पवयीनांसाठीही सुविधा

पालक आपल्या मुलांच्या नावाने PPF खाते उघडू शकतात. मात्र, पालक आणि अल्पवयीन यांच्यासाठी एकत्रित गुंतवणुकीची कमाल मर्यादा ₹१.५ लाख आहे.

मॅच्युरिटी नंतर काय?

१५ वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर खाते ५ वर्षांच्या ब्लॉकमध्ये पुढे वाढवता येते. यात अतिरिक्त गुंतवणूक करून निधी आणखी वाढवण्याची संधी मिळते. PPF ही सुरक्षित, करसवलतीची आणि दीर्घकालीन संपत्ती निर्माण करणारी योजना आहे. त्यामुळे नियमित गुंतवणुकीद्वारे मोठा फंड तयार करण्यासाठी हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

Web Title : हर साल ₹70,000 निवेश करें और परिपक्वता पर ₹18,98,498 पाएं: पीपीएफ योजना।

Web Summary : पीपीएफ 7.1% ब्याज के साथ सुरक्षित, गारंटीड रिटर्न प्रदान करता है। संभावित रूप से ₹18,98,498 पाने के लिए 15 वर्षों तक सालाना ₹70,000 निवेश करें। कर लाभ, ऋण और आंशिक निकासी विकल्प उपलब्ध हैं। बैंकों या डाकघरों में खोलें। 5 साल के ब्लॉक में विस्तार योग्य।

Web Title : Invest ₹70,000 yearly and get ₹18,98,498 on maturity: PPF scheme.

Web Summary : PPF offers secure, guaranteed returns with 7.1% interest. Invest ₹70,000 annually for 15 years to potentially receive ₹18,98,498. Tax benefits, loan, and partial withdrawal options are available. Open at banks or post offices. Extendable in 5-year blocks.