बीड एसीबीची 'फिल्डिंग' यशस्वी! १८ हजार स्वीकारणाऱ्या महावितरणच्या महिला अभियंता अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 18:21 IST2026-04-21T18:19:56+5:302026-04-21T18:21:35+5:30

महावितरणमध्ये खळबळ! १८ हजार रुपयांसाठी महिला अधिकारी एसीबीच्या विळख्यात

Mahavitaran Female Officer Trapped by Beed ACB While Accepting ₹18,000 Bribe | बीड एसीबीची 'फिल्डिंग' यशस्वी! १८ हजार स्वीकारणाऱ्या महावितरणच्या महिला अभियंता अटकेत

बीड एसीबीची 'फिल्डिंग' यशस्वी! १८ हजार स्वीकारणाऱ्या महावितरणच्या महिला अभियंता अटकेत

कडा (जि. बीड): राज्यात एकीकडे सौर ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी विविध सवलती दिल्या जात असताना, महावितरणचे अधिकारी मात्र याच प्रकल्पांच्या नावाखाली वसुली करत असल्याचे उघड झाले आहे. आष्टी येथील महावितरण कार्यालयातील सहायक अभियंता कोमल अर्जुन शिंदे यांना १८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी दुपारी रंगेहात अटक केली.

सोलर प्रकल्पासाठी मागितली लाच
तक्रारदाराने आपल्या सोलर प्रकल्पाची पडताळणी करून देण्याची विनंती केली होती. हे काम करण्यासाठी कोमल शिंदे यांनी १८ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदाराने याबाबत बीड एसीबीकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची शहनिशा केल्यानंतर एसीबीने आष्टी येथील कार्यालयात सापळा रचला. मंगळवारी दुपारी जसा तक्रारदाराने पैसे देण्याचा प्रयत्न केला, तसा दबा धरून बसलेल्या पथकाने कोमल शिंदे यांना रंगेहात पकडले.

महावितरणमध्ये खळबळ
बीड एसीबीचे उपअधीक्षक सोपान चिटमपल्ले आणि त्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. एका महिला अधिकाऱ्याला अशा प्रकारे लाच घेताना अटक झाल्यामुळे महावितरण विभागात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Web Title : बीड एसीबी का जाल: रिश्वत लेते हुए एमएसईडीसीएल इंजीनियर गिरफ्तार

Web Summary : बीड में, एक एमएसईडीसीएल सहायक अभियंता को सौर परियोजना को मंजूरी देने के लिए ₹18,000 की रिश्वत लेते हुए एसीबी ने रंगे हाथों पकड़ा। इस गिरफ्तारी से महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड में खलबली मच गई है।

Web Title : Beed ACB Trap: MSEDCL Engineer Arrested Accepting Bribe

Web Summary : In Beed, an MSEDCL assistant engineer was caught red-handed by the ACB for accepting an ₹18,000 bribe to approve a solar project. The arrest has caused a stir within the Maharashtra State Electricity Distribution Company Limited.