Defence Stocks: डिफेन्स क्षेत्रातील ZEN Technologies Ltd च्या शेअर्समध्ये गेल्या काही वर्षांत जबरदस्त तेजी पाहायला मिळाली आहे. अवघ्या ६ वर्षांत या शेअरची किंमत ₹२६ वरून थेट ₹१८२५ पर्यंत पोहोचली. एखाद्या गुंतवणूकदाराने सहा वर्षांपूर्वी यात ₹१ लाख गुंतवले असतील, तर त्याला आज तब्बल ₹७० लाखांपर्यंतचा परतावा मिळेल.
६ वर्षांत जबरदस्त झेप
मार्च २०२० मध्ये कंपनीचा शेअर सुमारे ₹२५.८० वर होता. सध्या तो NSE वर ₹१८२५ च्या इंट्रा-डे उच्चांकापर्यंत पोहोचला आहे. आजही BSE वर शेअर ₹१६६१.२५ वर उघडला आणि दिवसभरात सुमारे ११% वाढीसह ₹१८२३.७० पर्यंत गेला.
शेअरची कामगिरी...
गेल्या १ महिन्यात या शेअरमध्ये २४% पेक्षा अधिक वाढ झाली आहे. तर, एका वर्षात १८.५८% आणि पाच वर्षांत शेअर २२५७% वधारले. या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ₹२२६८.१५ आणि नीचांक ₹१२२४ आहे. सध्या कंपनीचे मार्केट कॅप ₹१५,९७२ कोटी आहे.
बिझनेस अपडेट
कंपनीला १२.७ मिमी, २३ मिमी, ३० मिमी आणि ४० मिमी क्रिटिकल वेपन सिस्टिम्स तयार करण्याचा परवाना मिळाला आहे. यामुळे डिफेन्स सेक्टरमध्ये कंपनीची पकड अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे.
(टीप-ही माहिती केवळ शेअरच्या कामगिरीबाबत आहे. ही गुंतवणुकीची शिफारस नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
