शेतशिवारात अनोळखी जोडप्याच्या मृत्यूचा थरार! दुर्गंधी सुटल्याने उघड झाला धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 17:31 IST2026-04-21T17:29:08+5:302026-04-21T17:31:40+5:30

अनोळखी जोडप्याचे मृतदेह अन् परिसरात खळबळ! दैठणा पोलिसांकडून तपास सुरू; मृतदेहांची ओळख पटवण्याचे आव्हान.

Mystery Deepens Over Double Death in Parbhani; Bodies of Unknown Couple Found Hanging from Tree | शेतशिवारात अनोळखी जोडप्याच्या मृत्यूचा थरार! दुर्गंधी सुटल्याने उघड झाला धक्कादायक प्रकार

शेतशिवारात अनोळखी जोडप्याच्या मृत्यूचा थरार! दुर्गंधी सुटल्याने उघड झाला धक्कादायक प्रकार

- लक्ष्मण कच्छवे
दैठणा (जि. परभणी):
परभणी तालुक्यातील पिंपळगाव ठोंबरे शेतशिवारात मंगळवारी सकाळी एका अनोळखी महिला आणि पुरुषाचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून परिसरात मोठी दुर्गंधी पसरली होती, शोध घेतला असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. या घटनेने परभणी जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून, हा मृत्यू आत्महत्या आहे की घातपात, याबाबत गूढ वाढले आहे.

७ ते ८ दिवसांपूर्वीची घटना?
मृतदेहांची अवस्था पाहता ही घटना साधारण आठवडाभरापूर्वी घडली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दोघांनीही ओढणीच्या साह्याने एकाच झाडाला गळफास घेतल्याचे दिसून आले. निर्जन शिवार असल्याने आणि दुर्गंधी सुटेपर्यंत कोणाच्याही लक्षात न आल्याने हा प्रकार अनेक दिवस दबून राहिला.

पोलीस तपास आणि मृतांची ओळख
घटनेची माहिती मिळताच दैठणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक जायभाये यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी परभणीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. अद्याप मृतांची ओळख पटलेली नसून, पोलिसांनी आसपासच्या गावांतील हरवलेल्या व्यक्तींची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे.

Web Title : खेत में अज्ञात जोड़े का शव मिला, रहस्य गहराया!

Web Summary : परभणी के पिंपलगांव ठोंबरे में एक जोड़े का शव पेड़ से लटका मिला। दुर्गंध के कारण शवों की खोज हुई, जो लगभग एक सप्ताह पुराने बताए जा रहे हैं। पुलिस आत्महत्या या हत्या की जांच कर रही है। मृतकों की पहचान अभी तक नहीं हो पाई है।

Web Title : Unidentified couple found dead in field, mystery deepens!

Web Summary : A couple was found hanging from a tree in Pimpelgaon Thombare, Parbhani. The bodies, discovered due to a foul odor, are estimated to be a week old. Police are investigating whether it was suicide or murder. Identities remain unknown.