Share Market Close : आज(२० एप्रिल) रोजी भारतीय शेअर बाजारात दिवसभर चढ-उताराचे वातावरण पाहायला मिळाले. मात्र, दिवसाखेर प्रमुख निर्देशांकांमध्ये किरकोळ वाढ पाहायला मिळाली. BSE Sensex २६.७६ अंकांनी (०.०३%) वाढून ७८,५२०.३० वर बंद झाला, तर NSE Nifty 50 ११.३० अंकांनी (०.०५%) वाढून २४,३६४.८५ वर स्थिरावला.
या सर्व चढ-उतारादरम्यान, BSE वर सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल ₹७१,००० कोटींनी घटले. म्हणजेच, गुंतवणूकदारांनी ₹७१,००० कोटी गमावले. BSE वरील टॉप ३० समभागांपैकी १८ शेअर्समध्ये घसरण दिसून आली, तर १२ शेअर्स किरकोळ वाढीसह बंद झाले.
टॉप गेनर्स
- ट्रेंट
- एसबीआय
- जेएसडब्ल्यू स्टील
- एशियन पेंट्स
- ग्रासिम इंडस्ट्रीज
टॉप लूजर्स
- जिओ फायनान्शियल
- हिंडाल्को
- एचडीएफसी लाइफ
- टाटा मोटर्स (पॅसेंजर व्हेईकल्स)
- कोटक महिंद्रा बँक
- मिडकॅप आणि स्मॉलकॅपवर दबाव
- निफ्टी मिडकॅप इंडेक्स: ०.२% घसरण
- निफ्टी स्मॉलकॅप इंडेक्स: ०.४% घसरण
- सेक्टरनिहाय कामगिरी
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
