Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > 'आम्ही डॉलरऐवजी चिनी युआनमध्ये व्यापार करू', UAE चा अमेरिकेला इशारा; युद्धावरून सुनावले

'आम्ही डॉलरऐवजी चिनी युआनमध्ये व्यापार करू', UAE चा अमेरिकेला इशारा; युद्धावरून सुनावले

US Dollar and Chinese Yuan: भारतानेही सुरू केला युआनचा वापर; डॉलरच्या वर्चस्वाला धोका?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 15:40 IST2026-04-20T15:40:28+5:302026-04-20T15:40:37+5:30

US Dollar and Chinese Yuan: भारतानेही सुरू केला युआनचा वापर; डॉलरच्या वर्चस्वाला धोका?

US Dollar and Chinese Yuan: 'We will trade in Chinese Yuan instead of Dollar', UAE warns America | 'आम्ही डॉलरऐवजी चिनी युआनमध्ये व्यापार करू', UAE चा अमेरिकेला इशारा; युद्धावरून सुनावले

'आम्ही डॉलरऐवजी चिनी युआनमध्ये व्यापार करू', UAE चा अमेरिकेला इशारा; युद्धावरून सुनावले

US Dollar and Chinese Yuan: अमेरिका-इराण संघर्षाची झळ आता UAE (यूएई) पर्यंत पोहोचू लागली आहे. यूएईने या तणावासाठी थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांना जबाबदार ठरवत इशारा दिला की, जर डॉलरची टंचाई निर्माण झाली, तर तेल आणि गॅस व्यवहारांसाठी चीनी युआनसह इतर चलनांचा वापर सुरू केला जाईल.

अमेरिकेच्या धोरणांवर यूएईची नाराजी

द वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालानुसार, पश्चिम आशियातील वाढत्या अस्थिरतेसाठी यूएईने अमेरिकेच्या आक्रमक धोरणांवर टीका केली आहे. इराणसोबत वाढत्या संघर्षामुळे प्रादेशिक आर्थिक स्थैर्य धोक्यात आल्याचे यूएईचे म्हणने.

डॉलरच्या वर्चस्वाला धोका?

मॅक्रोइकॉनॉमिक विश्लेषक लुक ग्रोमन यांच्या मते, यूएईने अमेरिकेकडे डॉलर स्वॅप लाइनची मागणी केली आहे. जर यूएईने तेल व्यवहारांसाठी युआनचा वापर सुरू केला, तर जागतिक स्तरावर डॉलरच्या वर्चस्वाला मोठा धक्का बसू शकतो. कारण अनेक दशकांपासून आंतरराष्ट्रीय तेल व्यापार प्रामुख्याने डॉलरमध्येच होतो. चीनकडे आधीच अनेक देशांसोबत चलन स्वॅप करार आहेत. त्यामुळे युआन हा पर्याय यूएईसाठी अधिक व्यवहार्य ठरू शकतो.

भारतानेही युआनचा वापर सुरू केला

अलीकडे भारतातील काही तेल कंपन्यांनी इराणकडून तेल खरेदी करताना डॉलरऐवजी युआनमध्ये पेमेंट केले आहे. याशिवाय इलेक्ट्रॉनिक्स आणि रिटेल क्षेत्रातील काही कंपन्याही रुपयाच्या कमजोरीमुळे युआनचा पर्याय विचारात घेत आहेत.

Web Title : यूएई की अमेरिका को धमकी: डॉलर की कमी होने पर युआन में व्यापार करेंगे।

Web Summary : यूएई ने ईरान तनाव पर अमेरिका को चेतावनी दी, डॉलर की कमी होने पर तेल व्यापार के लिए युआन पर विचार कर रहा है। इससे वैश्विक स्तर पर डॉलर का वर्चस्व खतरे में है।

Web Title : UAE threatens US: Trade in Yuan if Dollar shortage occurs.

Web Summary : UAE warns US over Iran tensions, considering Yuan for oil trade if dollar access is limited. This shift challenges dollar dominance globally.