SSC Exam Result 2026: बारावीप्रमाणे दहावीतही विभागात जिल्हा अव्वल; पुण्यात तब्बल १,२८,०२२ विद्यार्थी उत्तीर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 17:00 IST2026-05-08T17:00:10+5:302026-05-08T17:00:32+5:30

SSC Exam Result 2026 राज्याच्या एकूण निकालात मुलींनी बाजी मारल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे पुणे विभागातही मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल सरस असल्याचे दिसून येत आहे.

SSC Exam Result 2026 Like 12th, the district topped the department in 10th as well; As many as 1,28,022 students passed in Pune | SSC Exam Result 2026: बारावीप्रमाणे दहावीतही विभागात जिल्हा अव्वल; पुण्यात तब्बल १,२८,०२२ विद्यार्थी उत्तीर्ण

SSC Exam Result 2026: बारावीप्रमाणे दहावीतही विभागात जिल्हा अव्वल; पुण्यात तब्बल १,२८,०२२ विद्यार्थी उत्तीर्ण

पुणे: इयत्ता दहावी बाेर्ड परीक्षेमध्ये यंदा पुणे विभागाचा निकाल ९४.२४ टक्के लागला असून, यात पुणे जिल्हा अव्वल स्थानी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शुक्रवारी (दि. ८) निकाल जाहीर केल्यानंतर पुणे विभागानेही निकाल जाहीर करत ही माहिती दिली.

दहावी परीक्षेसाठी यंदा पुणे विभागात एकूण २ लाख ६६ हजार ६५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली हाेती. त्यांतील २ लाख ६४ हजार ९९२ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले हाेते. त्यांपैकी २ लाख ४९ हजार ७५३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, यांची टक्केवारी ९४.२४ इतकी आहे. पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांची संख्या ४,६३१ हाेती. त्यांपैकी ४,५०२ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून, उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या १,३८४ इतकी आहे. विभागीय अध्यक्ष औदुंबर उकिरडे व सचिव डॉ. मीनाक्षी राऊत यांनी ही माहिती दिली.

जिल्हानिहाय निकाल

जिल्हा == नोंदणी केलेले विद्यार्थी == प्रविष्ट विद्यार्थी == उत्तीर्ण विद्यार्थी == टक्केवारी

पुणे == १,३३,१७६ == १,३२,७०७ == १,२८,०२२ == ९६.४६
अहिल्यानगर == ६८,४७७ == ६७,९७० == ६३,००४ == ९२.६९
साेलापूर == ६५,००३ == ६४,३१५ == ५८,७२७ == ९१.३१
एकूण == २,६६,६५६ == २,६४,९९२ == २,४९,७५३ == ९४.२४

मुलांपेक्षा मुलीच हुशार

राज्याच्या एकूण निकालात मुलींनी बाजी मारल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे पुणे विभागातही मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल सरस असल्याचे दिसून येत आहे. विभागामध्ये पुणे जिल्ह्यात मुलांची टक्केवारी ९५.३३, तर मुलींची टक्केवारी ९७.७० आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात मुलांची टक्केवारी ९०.४०, तर मुलींची टक्केवारी ९५.५३ आहे. याचबराेबर साेलापूर जिल्ह्यात मुलांची टक्केवारी ८७.९१, तर मुलींची टक्केवारी ९५.३२ इतकी आहे. यावरून विभागील तिनही जिल्ह्यांत मुलांपेक्षा मुलीच हुशार निघाल्या आहेत, असे स्पष्ट हाेते.

Web Title : पुणे एसएससी परीक्षा 2026 में शीर्ष पर; लड़कियों ने लड़कों को पछाड़ा।

Web Summary : पुणे विभाग ने एसएससी परीक्षाओं में 94.24% हासिल किया, जिसमें पुणे जिला अग्रणी रहा। पुणे के 1,28,022 छात्र उत्तीर्ण हुए। पुणे, अहिल्यानगर और सोलापुर जिलों में लड़कियों ने लड़कों से बेहतर प्रदर्शन किया।

Web Title : Pune Tops SSC Exam 2026; Girls Outshine Boys.

Web Summary : Pune division achieved 94.24% in SSC exams, with Pune district leading. 1,28,022 Pune students passed. Girls outperformed boys across all three districts in the division: Pune, Ahilyanagar and Solapur.