तब्बल २८ लाखांचा चंदनसाठा जप्त; पुरंदर तालुक्यात पुणे ग्रामीण एटीएसची धडक कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 16:36 IST2026-05-19T16:36:21+5:302026-05-19T16:36:46+5:30

वाल्हे परिसरात एका खबऱ्याकडून मांडकी येथील पाटील वस्तीवरील शेतात मोठ्या प्रमाणात चोरीचे चंदन लपवून ठेवले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

Sandalwood worth Rs 28 lakh seized; Pune Rural ATS conducts crackdown in Purandar taluka | तब्बल २८ लाखांचा चंदनसाठा जप्त; पुरंदर तालुक्यात पुणे ग्रामीण एटीएसची धडक कारवाई

तब्बल २८ लाखांचा चंदनसाठा जप्त; पुरंदर तालुक्यात पुणे ग्रामीण एटीएसची धडक कारवाई

नीरा : पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) मांडकी (ता. पुरंदर) येथे सोमवारी (दि.१८) धडक कारवाई करत तब्बल २८ लाख रुपयांचा चोरीचा चंदनसाठा जप्त केला. गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी फरार झाला आहे. 

पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांच्या आदेशानुसार दहशतवाद विरोधी शाखेचे पथक सासवड व जेजुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेशांतर करून रेकॉर्डवरील आरोपींचा शोध घेत होते. यावेळी वाल्हे परिसरात एका खबऱ्याकडून मांडकी येथील पाटील वस्तीवरील शेतात मोठ्या प्रमाणात चोरीचे चंदन लपवून ठेवले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. 

माहितीची खातरजमा करून एटीएस पथकाने जेजुरी पोलिसांच्या मदतीने संबंधित ठिकाणी छापा टाकला. विलास रावजी भोसले यांच्या शेतात हिरव्या कापडाखाली लपवून ठेवलेले तब्बल ५६० किलो वजनाचे चंदनाचे लाकडी ओंडके आढळून आले. यासोबतच झाडे तोडण्यासाठी वापरण्यात येणारा बॅटरीवर चालणारा कटर आणि दोन लोखंडी ड्रिलही पोलिसांनी जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत २८ लाख ५ हजार २०० रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी शेतमालक विलास भोसले यांची चौकशी करण्यात आली असता, हा चंदनसाठा त्यांचा भाचा प्रतिक प्रमोद खुंटे याने ठेवला असल्याची माहिती पुढे आली. पोलिसांनी त्याचा शोध घेतला असता तो फरार असल्याचे समोर आले. 

या प्रकरणी जेजुरी पोलीस ठाण्यात प्रतिक प्रमोद खुंटे याच्याविरुद्ध बीएनएस कलम ३०३(२), भारतीय वन अधिनियम १९२७ मधील कलम २६, ४१, ४२ तसेच महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम १९८८ मधील कलम ३ व ४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असून आरोपी प्रतिक खुंटे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याच्यावर सातारा जिल्ह्यात जबरी चोरीसह गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचेही स्पष्ट झाले आहे. ही कारवाई बारामती अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, जेजुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली एटीएसचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांच्या पथकाने केली. 

Web Title : पुरंदर में चंदन का विशाल भंडार जब्त; पुणे एटीएस की कार्रवाई।

Web Summary : पुणे एटीएस ने पुरंदर में ₹28 लाख मूल्य का चंदन जब्त किया। छापे में 560 किलो चंदन की लकड़ी और उपकरण मिले। मुख्य संदिग्ध, प्रतीक खुंटे फरार है और उसके खिलाफ कई मामले दर्ज हैं।

Web Title : Massive sandalwood stash seized in Purandar; ATS action in Pune.

Web Summary : Pune ATS seized ₹28 lakh worth of sandalwood in Purandar. The raid revealed 560 kg of sandalwood logs and tools. The prime suspect, Pratik Khunte, is absconding and has multiple prior offenses.