Video: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती; नाशिक प्रकरणावरून अमित ठाकरे संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 11:57 IST2026-04-17T11:56:06+5:302026-04-17T11:57:32+5:30

- हे ड्रग्स नेमके येतात कुठून? सरकारकडे याचे ठोस आकडे नाहीत का त्यांनी पोलिसांना पूर्ण स्वातंत्र्य देण्याची गरज व्यक्त करत प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी केली.

Pune news Nashik case Amit Thackeray statement If it were me, I would have hanged the accused; Amit Thackeray angry over Nashik case | Video: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती; नाशिक प्रकरणावरून अमित ठाकरे संतापले

Video: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती; नाशिक प्रकरणावरून अमित ठाकरे संतापले

पुणे - महाराष्ट्रात वाढत चाललेल्या ड्रग्स तस्करीच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका करत कठोर कारवाईची मागणी केली आहे. पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राज्यात आणि प्रमुख शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर ड्रग्सची विक्री सुरू असल्याचा आरोप करत त्यांनी विचारले की, हे ड्रग्स नेमके येतात कुठून? सरकारकडे याचे ठोस आकडे नाहीत का त्यांनी पोलिसांना पूर्ण स्वातंत्र्य देण्याची गरज व्यक्त करत प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी केली.

अमित ठाकरे पुढे म्हणाले की, शाळांच्या परिसरातही ड्रग्सची विक्री होत असल्याचे गंभीर चित्र समोर येत आहे. यावर कठोर कारवाई आणि कडक शिक्षा झाली पाहिजे. अन्यथा हे प्रकार थांबणार नाहीत.. असे त्यांनी स्पष्ट केले. आवश्यक असल्यास मनसे रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिला.



नाशिकमधील प्रकरणावर बोलताना अमित ठाकरे यांनी कंपन्यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित केले. सर्व कंपन्यांचे ऑडिट अनिवार्य केले पाहिजे. कोण काम करतं, त्याची पूर्ण माहिती प्रशासनाकडे असली पाहिजे, असं म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला. यावेळी अमित ठाकरे यांनी अत्यंत कठोर भूमिका घेत माध्यमांशी बोलतांना म्हणाले, मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती.. एक कडक उदाहरण तयार झालं पाहिजे, जेणेकरून भविष्यात कोणीही अशा प्रकारचे गुन्हे करण्याचे धाडस करणार नाही. तसेच, पोलिसांना २४ तास फ्री हँड देण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी मुख्यमंत्री आणि सरकारवर अप्रत्यक्ष टीका केली. पोलिसांना खरंच स्वातंत्र्य आहे का? असा सवालही त्यांनी माध्यमांशी बोलतांना उपस्थित केला.

Web Title : अमित ठाकरे ने नाशिक मामले के आरोपियों के लिए मौत की सजा की मांग की।

Web Summary : अमित ठाकरे ने महाराष्ट्र में बढ़ते नशीले पदार्थों की तस्करी पर सरकार की कड़ी आलोचना की। उन्होंने कानून और व्यवस्था पर सवाल उठाते हुए सख्त कार्रवाई और नाशिक घटना के बाद कंपनियों के पूरी तरह से ऑडिट की मांग की। उन्होंने भविष्य में अपराधों को रोकने के लिए आरोपियों को मौत की सजा देने की वकालत की और पुलिस को पूरी स्वायत्तता देने का आग्रह किया।

Web Title : Amit Thackeray demands death penalty for Nashik case accused.

Web Summary : Amit Thackeray strongly criticized the government over rising drug trafficking in Maharashtra. He questioned law and order, demanding strict action and a thorough audit of companies after the Nashik incident. He advocated for capital punishment for the accused to deter future crimes and urged giving police full autonomy.