शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime: बारामतीत वंजारवाडी जवळ सोमनाथ हॉटेलचे अमृता लॉजवर मध्यरात्री पोलिसांचा छापा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 10:39 IST

Pune Crime - वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करत केली दोघांना अटक; बारामती तालुका पोलिसांची कामगिरी, पाच महिलांची सुटका

बारामती : बारामती-भिगवण रोडवरील वंजारवाडीजवळील सोमनाथ हॉटेलमधील अमृता लॉजवर सुरू असलेल्या अवैध वेश्या व्यवसायावर बारामती तालुका पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकला. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, पाच महिलांची सुटका करण्यात आली आहे. मंगळवारी (दि. १४) पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास पोलिसांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव आणि उपनिरीक्षक रामहरी भोसले यांच्या पथकाने बोगस ग्राहकाच्या मदतीने सापळा रचला. पंचांना सोबत घेऊन नियोजनपूर्वक अमृता लॉजवर धाड टाकण्यात आली. छापेमारीदरम्यान लॉजमधील विविध खोल्यांची तपासणी करण्यात आली असता काही ठिकाणी महिला आणि ग्राहक एकत्र आढळले. चौकशीदरम्यान, संबंधित आरोपी बाहेरून महिलांना आणून त्यांना ग्राहकांना पुरवत असल्याचे उघड झाले. ग्राहकांकडून पैसे वसूल करून त्यातून स्वतःचा आर्थिक फायदा मिळविण्यात आल्याचेही उघड झाले.

या प्रकरणात अजित जयसीन शेट्टी (वय ३८, हॉटेल चालक) आणि चाँद कलाम आलम (वय २०) यांना अटक करण्यात आली आहे. या घटनेत सापडलेल्या पश्चिम बंगाल येथील ३ व भिवंडी मुंबई येथील २ अशा ५ महिलांची सुटका करण्यात आली असून, त्यांना सुधारगृहात ठेवण्यात आले आहे. दोन्ही आरोपींनी संगनमत करून महिलांना पैशांचे आमिष दाखवून देहव्यवसाय चालविल्याचे निष्पन्न झाले आहे. कारवाईदरम्यान पोलिसांनी बोगस ग्राहकाला दिलेल्या नोटांसह रोख रक्कम, मोबाइल फोन, कंडोम पाकिटे तसेच ग्राहकांची नोंद असलेले रजिस्टर असा सुमारे १७,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Baramati: Police Raid Amruta Lodge, Bust Sex Racket; Arrests Made

Web Summary : Baramati police raided Amruta Lodge, uncovering an illegal sex racket. Two arrested, five women rescued from West Bengal and Mumbai. Cash, phones seized.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPune Crimeपुणे क्राईम बातम्या