शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
2
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
3
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
4
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
5
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
6
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
7
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
8
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
9
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
10
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
11
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
12
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
13
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
14
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
15
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
16
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
17
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
18
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
19
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
20
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
Daily Top 2Weekly Top 5

‘कासवबाबा’चे इंदापुरातही जाळे ? राजकीय इच्छुकांसह अनेकांनी घेतली कृपादृष्टीची धाव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 16:34 IST

- टेंभुर्णी पोलिसांनी नुकतेच या बाबासह त्याच्या भावाविरुद्ध गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे.

इंदापूर : कासवाच्या माध्यमातून लोकांना गंडा घालणाऱ्या आढेगावच्या तथाकथित ‘कासवबाबा’चे इंदापूर तालुक्यातही भक्कम नेटवर्क असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. सर्वसामान्य नागरिकांबरोबरच निवडणुकांच्या काळात अनेक इच्छुक उमेदवारांनीही या बाबाची कृपादृष्टी मिळावी म्हणून त्याच्या आश्रमाची पायधूळ झाडल्याची चर्चा रंगली आहे. काहींनी मोठ्या रकमा मोजून जिवंत तसेच कृत्रिम कासवे घेतल्याची माहितीही समोर येत आहे.

इंदापूर शहराच्या पूर्वेला पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या तरटगाव परिसरातून भीमानगरमार्गे अवघ्या काही किलोमीटर अंतरावर आढेगाव येथे नानासाहेब वीरकर ऊर्फ ‘कासवबाबा’चा वातानुकूलित आश्रम आहे. पैशांचा पाऊस पाडणारे आणि संकटापासून संरक्षण देणारे कासव विकत देण्याच्या नावाखाली या भोंदूबाबाने सर्वसामान्य, सुशिक्षित तसेच राजकीय क्षेत्रातील लोकांना जाळ्यात ओढून लाखो रुपये उकळल्याचा आरोप आहे.

टेंभुर्णी पोलिसांनी नुकतेच या बाबासह त्याच्या भावाविरुद्ध गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे. त्यानंतर विविध भागांतून तक्रारी समोर येऊ लागल्या असून, या प्रकरणाची व्याप्ती वाढत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, इंदापूर तालुक्यातील कांदलगाव, तरटगाव, निरा-नृसिंहपूर, निमगाव केतकी, वालचंदनगर, जंक्शन, लासुर्णे या भागांत या बाबाचे एजंट आणि भक्तांचे जाळे कार्यरत असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषद निवडणुकांच्या काळात अनेक इच्छुक उमेदवारांनी या आश्रमाला भेटी दिल्याचे बोलले जात आहे.

राजकीय क्षेत्रातील काही व्यक्ती, पोलिस अधिकारी, महाराष्ट्र केसरी दर्जाचे कुस्तीगीर तसेच युवकांमध्ये प्रभाव असलेल्या काही व्यक्तींसमवेत ‘कासवबाबा’ची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने या प्रकरणाची चर्चा अधिकच रंगली आहे. पोलिसांनी तपासाची दिशा इंदापूरकडे वळवल्यास या संपूर्ण जाळ्याचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणल्याचे बोलले जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : ‘Tortoise Baba’ network in Indapur? Politicians seek blessings.

Web Summary : Self-proclaimed 'Tortoise Baba', already arrested for fraud, is suspected of having a strong network in Indapur. Politicians and others allegedly sought his blessings, buying live and artificial tortoises. Police investigation may expose a wider network of agents and devotees.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPune Crimeपुणे क्राईम बातम्याCrime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्र