दौंड : नसरापूर अत्याचार घटना ताजी असताना दौंड तालुक्यात एक स्नॅपजनक घटना घडली आहे. देऊळगावराजे हद्दीत असलेल्या हनुमानवस्ती येथे नराधम बापाने नऊ वर्षाच्या अनामिकाच्या गळ्यावर आणि हातावर झाडे तोडण्याचे कटर मशीन फिरवून तिचा क्रूरपणे खून केला. दरम्यान या मुलीला साडी मध्ये गुंडाळून तिला पेटवून दिल्याची घटना. रविवार (दि.३) रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली.
बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे या अल्पवयीन मुलीचा अमानुषपणे खून केल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी शांताराम चव्हाण (वय ३३, रा. देऊळगावराजे,ता. दौंड ) याला अटक करण्यात आली आहे.मयत झालेली मुलगी आरोपीची पहिल्या बायकोची मुलगी होती. अनामिका ( वय ९) आणि तिचा भाऊ संस्कार (वय १०) यांचे शाळेचे निकाल लागले होते. तेव्हा अनामिकाने निकालातील क्रमांक मध्ये फेरफार केल्याच्या कारणावरून आरोपीने राहत्या घरात मुलीचा खून केला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.
Web Summary : In Daund, a father murdered his 9-year-old daughter, Anamika, with a cutter machine over a minor issue regarding school results. He then wrapped her in a saree and burned her. The accused, Shantaram Chavan, has been arrested. The shocking incident has sparked outrage.
Web Summary : दौंड में, एक पिता ने स्कूल के नतीजों को लेकर मामूली बात पर अपनी 9 वर्षीय बेटी अनामिका की कटर मशीन से हत्या कर दी। फिर उसने उसे साड़ी में लपेटकर जला दिया। आरोपी शांताराम चव्हाण को गिरफ्तार कर लिया गया है। इस चौंकाने वाली घटना से आक्रोश फैल गया है।