1 / 12दिल्लीच्या मंडोली रोड येथील रहिवासी सुभाष चंद्र गोयल यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी दिवस-रात्र एक केली. रक्ताचं पाणी करून कमावलेल्या पैशातून त्यांनी मुलांचं शिक्षण पूर्ण केलं. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी भाजी विकली, चहाची टपरी चालवली आणि किराणा दुकानही चालवलं.2 / 12पत्नी मीरा यांनी घरची जबाबदारी सांभाळली. या दोघांचे कष्ट आणि त्याग अखेर फळाला आले, जेव्हा त्यांचा मुलगा आयुष गोयल याने IIM मधून MBA पूर्ण केलं आणि त्याला २८ लाख रुपयांच्या पॅकेजची नोकरी मिळाली.3 / 12कुटुंबाचे आर्थिक परिस्थिती बदलणार असं वाटत असतानाच अवघ्या ६ महिन्यांत सुभाष चंद्र गोयल यांना मोठा धक्का बसला. आयुषने आपली मोठ्या पगाराची नोकरी सोडून UPSC परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय त्यांना सांगितला. 4 / 12१० लाख उमेदवारांमधून केवळ ९०० ते १००० जणांची निवड होणाऱ्या या देशातील सर्वात कठीण परीक्षेसाठी मुलाने घेतलेला हा महत्त्वाचा निर्णय ऐकून वडील खचून गेले. मात्र आयुषने वडिलांना विश्वास दिला. 5 / 12दिल्लीतील 'राजकीय प्रतिभा विकास विद्यालय' या सरकारी शाळेत शिकलेल्या आयुषने ही मोठी जोखीम पत्करली आणि आपल्या जिद्दीच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नात UPSC २०२२ ची परीक्षा उत्तीर्ण केली.6 / 12आयुष केवळ २३ वर्षांचा असताना त्याने पहिल्याच प्रयत्नात १७१ वी रँक मिळवला. ईडब्ल्यूएस (EWS) कोट्यामुळे त्याची आयएएस (IAS) पदासाठी निवड झाली आणि त्याला केरळ कॅडर मिळालं. 7 / 12आयुषसाठी ही वाट सोपी नव्हती. आपल्या संघर्षाबद्दल सांगताना तो म्हणाला, 'आमचं कुटुंब १९९७ मध्ये हरियाणाच्या हिसारहून दिल्लीत स्थायिक झालं. वडिलांनी आधी भाजी विकली, मग चहाची टपरी चालवली आणि आता ते शाहदरा येथे किराणा दुकान चालवतात.'8 / 12आयुषने त्याचं शालेय शिक्षण सरकारी शाळेतून पूर्ण केलं. दहावीत त्याला ९१.२% आणि १२ वीत ९६.२% गुण मिळाले. त्यानंतर दिल्ली विद्यापीठाच्या हंसराज कॉलेजमधून त्याने अर्थशास्त्रात पदवी घेतली. 9 / 12पदवीच्या शेवटच्या वर्षात त्याने 'कॅट' (CAT) परीक्षा उत्तीर्ण करून IIM कोझिकोडमध्ये प्रवेश मिळवला. शिक्षणासाठी त्याने २० लाखांचे शिक्षणासाठी कर्ज घेतलं होतं. MBA नंतर त्याला जेपी मॉर्गन कंपनीत २८ लाखांचे पॅकेज मिळालं. मात्र त्याचं मन कामात रमलं नाही. 10 / 12देशाला आणि समाजाला, विशेषतः शिक्षण क्षेत्रात योगदान देण्याच्या इच्छेपोटी त्याने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. कंपनीने त्याला दीड कोटींच्या पॅकेजवर न्यूयॉर्कला जाण्याची ऑफर दिली होती, पण आयुष आपल्या निर्णयावर ठाम होता.11 / 12आयुषने जेव्हा नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्याचे वडील आजारी पडले. वडिलांची अवस्था पाहून आयुषने दोन महिने नोकरी सांभाळून दिवसाचे ६ तास अभ्यास केला, पण यामुळे त्याच्या प्रकृतीवर परिणाम होऊ लागला. 12 / 12शेवटी स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून त्याने नोव्हेंबर २०२१ मध्ये राजीनामा दिला आणि पूर्णवेळ अभ्यासाला सुरुवात केली. अवघ्या काही महिन्यांच्या तयारीनंतर जून २०२२ मध्ये त्याने पूर्व परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात यशाला गवसणी घातली.