तुमच्या गाडीवर वाहतूक नियमांच्या उल्लंघनाचे चलन प्रलंबित आहे का? जर असेल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ९ मे २०२६ रोजी देशभरात 'राष्ट्रीय लोक अदालत' भरवण्यात येणार आहे. यामध्ये तुम्ही तुमचे जुने ट्रॅफिक चलन्स अत्यंत कमी दंड भरून किंवा सामोपचाराने निकाली काढू शकता.
वाचकांसाठी ही आनंदाची बाब आहे की, या लोक अदालतीमध्ये तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतींनी सहभाग घेऊ शकता. ज्यांना प्रत्यक्ष न्यायालयात जाणे शक्य नाही, ते 'व्हर्च्युअल लोक अदालत'च्या माध्यमातून आपले प्रकरण मिटवू शकतात. यामुळे वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होणार आहे.
लोक अदालतीचा फायदा काय?
अनेकदा लोक अदालतीमध्ये दंडाची रक्कम मोठ्या प्रमाणात कमी केली जाते. प्रलंबित चलन न्यायालयात गेल्यावर होणारा मनस्ताप आणि फेऱ्या यातून तुमची कायमची सुटका होते. लोक अदालतीमध्ये घेतलेला निर्णय हा अंतिम असतो आणि त्याविरोधात पुन्हा अपील करता येत नाही, ज्यामुळे प्रकरणाचा तात्काळ निकाल लागतो.
कशी करावी नोंदणी?ज्या नागरिकांना आपले चलन लोक अदालतीमध्ये ठेवायचे आहे, त्यांना आधी ई-चलन पोर्टलवर जाऊन आपल्या प्रकरणाची स्थिती तपासावी लागेल. त्यानंतर संबंधित जिल्ह्याच्या विधी सेवा प्राधिकरणाकडे संपर्क साधून किंवा ऑनलाइन पोर्टलवर टोकन घेऊन नोंदणी करता येईल.
Web Summary : Settle pending traffic challans with reduced fines at the National Lok Adalat on May 9, 2026. Participate online or offline, saving time and money. Benefit from significantly reduced penalties and avoid court hassles. Register via the e-challan portal and district legal services authority.
Web Summary : 9 मई, 2026 को राष्ट्रीय लोक अदालत में लंबित ट्रैफिक चालान कम जुर्माने के साथ निपटाएं। ऑनलाइन या ऑफलाइन भाग लें, समय और धन बचाएं। जुर्माने में महत्वपूर्ण कमी से लाभ उठाएं और अदालती झंझटों से बचें। ई-चालान पोर्टल और जिला विधिक सेवा प्राधिकरण के माध्यम से पंजीकरण करें।