शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
2
Latest Marathi News LIVE :पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल अरविंद केजरीवालांना शंका, 'या' मुद्द्यावर ठेवले बोट
3
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
4
आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त
5
नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांचा 'ओली' पॅटर्न; भारतासोबत पंगा घेणारे 'हे' २ मोठे निर्णय!
6
'राजा शिवाजी'साठी बॉलिवूड कलाकारांनी किती मानधन घेतलं? रितेश देशमुखचा गौप्यस्फोट, म्हणाला- "अभिषेक बच्चन..."
7
सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी!
8
स्मार्ट होम की मृत्यूचा सापळा? आग लागताच स्मार्ट लॉक खराब; दरवाजा न उघडल्याने ९ जणांचा बळी
9
एमजीआर, एनटीआर ते विजय... दक्षिणेतील मतदार अभिनेत्यांमध्ये नेता का शोधतात? ही आहेत ५ कारणं
10
बनावट जन्म दाखला घोटाळा: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून SITद्वारे सखोल चौकशीचे आदेश
11
British Airways: विमान उडवायचं नाही, फक्त जमिनीवर चालवायचंय; 'ही' एअरलाइन कंपनी पायलट्सना देतेय ९५ लाखांची सॅलरी
12
Mangal Gochar 2026: ११ मे ते २१ जून 'या' तीन राशींसाठी सुवर्णकाळ; मंगळ देणार प्रगतीची मोठी संधी!
13
अरे देवा! मुलीचं मोबाईलचं व्यसन सोडवण्यासाठी आई-वडिलांनी ६५ हजार देऊन ठेवले ४ बाऊन्सर
14
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
15
प्रेयसीच्या भावावर सूड उगवण्यासाठी दीड वर्षाच्या चिमुरडीचा काटा काढला; १३ वर्षांनंतर न्याय मिळालाच!
16
हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव
17
पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर
18
८ महिन्याची गर्भवती, घरोघरी जात केला प्रचार; चक्कर येऊन पडली तरी हिंमत हरली नाही; आज बनली आमदार
19
लग्नाच्या प्रश्नांना अन् दडपणाला कशी सामोरी जातेस? प्राजक्ता माळी म्हणाली, "जे तुमचं असतं..."
20
भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 11:54 IST

तामिळनाडू विधानसभेचे निकाल लागलेत. त्यात टीवीके सर्वात मोठा पक्ष बनला आहे परंतु सत्ता स्थापन करण्यासाठी लागणाऱ्या बहुमतापासून विजय यांचा पक्ष दूर आहे.

चेन्नई - ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आता स्पष्ट झाले आहेत. एकीकडे पश्चिम बंगालमध्ये भाजपाने पहिल्यांदाच ममता बॅनर्जी यांच्या गडाला भेदत इतिहास रचला आहे. केरळमध्ये काँग्रेस नेतृत्वातील आघाडीने सत्ता काबीज केली आहे. आसाम, पुदुचेरी येथे भाजपाने सत्ता राखली तर दुसरीकडे तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाने सगळ्यांनाच आश्चर्यचकीत केले. थलापती विजय यांच्या पक्षाला १०८ जागा मिळाल्या आहेत. याठिकाणी बहुमतापासून टीवीके १० जागा दूर आहेत. त्यातच विजय यांचे वडील चंद्रशेखर यांनी काँग्रेसला सत्तेची ऑफर दिली आहे. 

निकालानंतर विजय यांचे वडील एस चंद्रशेखर यांनी माध्यमांना सांगितले की, काँग्रेसचा एक इतिहास आणि परंपरा आहे. काँग्रेस कमकुवत का होतेय, त्याचे कारण म्हणजे सत्तेचा अभाव. दुसऱ्या पक्षाला पाठिंबा देऊन काँग्रेस आणखी कमकुवत होतेय. ती सत्ता आम्ही काँग्रेसला देऊ. विजय देण्यासाठी तयार आहे. जर तुम्हाला ती सत्ता मिळत असेल तर काँग्रेस त्यांचा इतिहास आणि वारसा वाचवू शकते. या संधीचा त्यांनी वापर करायला हवा अशी ऑफरच त्यांनी दिली.

काय आहे सत्तेचे समीकरण?

तामिळनाडू विधानसभेचे निकाल लागलेत. त्यात टीवीके सर्वात मोठा पक्ष बनला आहे परंतु सत्ता स्थापन करण्यासाठी लागणाऱ्या बहुमतापासून विजय यांचा पक्ष दूर आहे. टीवीकेला १०८ जागा मिळाल्या आहेत मात्र बहुमतासाठी लागणारा ११८ आकडा गाठायला विजय यांना आणखी एका पक्षाची गरज भासत आहे. डीएमकेसोबत ते सत्तेत जाणार नाहीत कारण त्यांच्याविरोधात रागाचा वापर करून टीवीके सत्तेकडे वाटचाल करत होता. विजय यांच्या वडिलांना काँग्रेससोबत आघाडी करायची आहे. सध्याचे नंबर पाहिले तर तामिळनाडूत डिएमकेजवळ ५९ तर काँग्रेसला ५ जागा मिळाल्या आहेत. जर काँग्रेस टीवीकेसोबत आली तर हा आकडा ११३ पर्यंत पोहचतो. त्यानंतर बहुमतासाठी ५ जागांची गरज लागेल. त्यात पीएमके, आययूएलसारख्या पक्षांसोबत चर्चा होऊ शकते. ज्यांच्याकडे प्रत्येकी ४ आणि २ जागा आहेत. 

काँग्रेसचं तामिळनाडूत अस्तित्व काय?

तामिळनाडूच्या डिएमके सरकारमध्ये काँग्रेसचा कुठलाही आमदार मंत्री नव्हता. डिएमके काँग्रेसच्या इंडिया आघाडीचा भाग असला तरी ते सरकारमध्ये सहभागी नव्हते. आता जर काँग्रेस टीवीकेसोबत गेल्यास सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद मिळेल. देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेससाठी ही संजीवनी ठरेल. मात्र स्टॅलिन यांच्यासोबत आघाडी धर्म पाळायचा की टीवीकेसोबत जात सत्तेतून पक्ष वाढवायचा याचा निर्णय काँग्रेसला घ्यावा लागणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Congress Opportunity: TVK's Post-Election Alliance Offer in Tamil Nadu

Web Summary : Tamil Nadu sees TVK gaining 108 seats, short of majority. Vijay's father offers Congress power, reviving its presence. Alliance with DMK unlikely. Congress faces decision: align with TVK for power or stay with DMK.
टॅग्स :Assembly Election Resultsविधानसभा निवडणूक निकाल २०२६Tamilnaduतामिळनाडूcongressकाँग्रेसThalapathy Vijayथलापती विजय