शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 12:39 IST

1 / 7
शहरांमधील वाढत्या जागेच्या टंचाईमुळे सध्या २०, ३० किंवा अगदी ५० मजली इमारतींचे पेव फुटले आहे. बिल्डर्सकडून 'आकाशाला गवसणी घालणारे घर' अशा जाहिराती करून ग्राहकांना आकर्षित केले जाते. पण, प्रत्यक्षात राहण्यासाठी गेल्यावर या 'उंच' स्वप्नांचे रूपांतर 'मोठ्या' त्रासात होऊ शकते. गाझियाबादमधील 'वेवसिटी'मध्ये राहणारे शिक्षक राहुल गौतम यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे, ज्यामध्ये त्यांना सहकुटुंब १३ मजले पायऱ्यांनी चढावे लागले.
2 / 7
राहुल गौतम यांच्या बिल्डिंगमध्ये सकाळी १० वाजल्यापासून वीज गायब होती. संध्याकाळी ४ वाजेपर्यंतही वीज न आल्याने लिफ्ट बंद होती. अशा परिस्थितीत राहुल यांना त्यांची पत्नी, मुले आणि हातातील जड बॅगा घेऊन १३ व्या मजल्यावरील आपल्या घरापर्यंत पायऱ्यांनी चढावे लागले. व्हिडिओमध्ये राहुल सांगतात, 'खिडकीतून बाहेरचे सुंदर नजारे दिसतील म्हणून इतक्या उंचीवर घर घेतले होते, पण लिफ्ट नसेल तर काय हाल होतात, याचा विचार केला नव्हता.' वर्षातून असे दोन-तीन दिवस कसरतीचे असतातच, अशी मिश्किल पण हतबल टिप्पणीही त्यांनी केली.
3 / 7
उंच इमारती पूर्णपणे लिफ्टवर अवलंबून असतात. तांत्रिक बिघाड किंवा वीज पुरवठा खंडित झाल्यास (विशेषतः जनरेटर बॅकअप नसल्यास) रहिवाशांचे हाल होतात. अशा वेळी ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि रुग्णांसाठी हा प्रवास जीवघेणा ठरू शकतो.
4 / 7
हा सर्वात गंभीर प्रश्न आहे. भारतातील अनेक शहरांमध्ये अग्निशमन दलाकडे ७०-८० मीटरपेक्षा जास्त उंचीवर पोहोचणाऱ्या शिड्या उपलब्ध नाहीत. जर २० व्या किंवा ३० व्या मजल्याच्या वर आग लागली, तर बचावकार्य करणे अत्यंत कठीण होते. अशा वेळी रहिवाशांना केवळ इमारतीच्या अंतर्गत अग्निशमन यंत्रणेवर अवलंबून राहावे लागते, जी अनेकदा नादुरुस्त असते.
5 / 7
तज्ज्ञांच्या मते, अति उंचीवर राहणाऱ्या काही लोकांना 'High Altitude' मुळे येणारे नैराश्य किंवा अस्वस्थता जाणवू शकते. तसेच, लिफ्टवर अवलंबून राहिल्याने शारीरिक हालचाली कमी होतात. काही संशोधनांनुसार, जमिनीपासून जास्त उंचीवर राहणाऱ्या लोकांमध्ये आपत्कालीन वैद्यकीय मदत (उदा. हार्ट अटॅकच्या वेळी पॅरामेडिक्स) पोहोचण्यास विलंब झाल्याने जीवितहानीचा धोका वाढतो.
6 / 7
हाय-राईज इमारतींमध्ये लिफ्ट, पाण्याचे पंप, फायर फायटिंग सिस्टीम आणि चोवीस तास सुरक्षा यांसाठी मोठ्या प्रमाणात वीज आणि मनुष्यबळ लागते. यामुळे अशा सोसायट्यांचे 'मेंटनन्स' सामान्य इमारतींच्या तुलनेत दुपटीने किंवा तिपटीने जास्त असते, जो तुमच्या खिशाला कायमचा फटका बसवतो.
7 / 7
भूकंप किंवा वादळासारख्या परिस्थितीत उंच इमारतींमध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण जास्त असते. जोराच्या वाऱ्यामुळे वरच्या मजल्यांवर होणारी कंपने अनेकांना अस्वस्थ करतात. तसेच, आपत्कालीन वेळी इमारत रिकामी करताना पायऱ्यांचा वापर करावा लागत असल्याने चेंगराचेंगरीची शक्यता वाढते.
टॅग्स :Real Estateबांधकाम उद्योग