पाकिस्तानातील प्रसिद्ध धार्मिक गुरु आणि 'शेखुल हदीस' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मौलाना मुहम्मद इदरीस तरंगजई याची मंगळवारी सकाळी अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. चस्रद्दा येथील उस्मानजई भागात हा हल्ला झाला. विशेष म्हणजे, मारला गेलेला मौलाना हा कुख्यात दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा कट्टर समर्थक होता.
पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, मौलाना इदरीस तरंगजई आपल्या गाडीतून प्रवास करत असताना 'मुस्लिम मॉडेल स्कूल'जवळील एका व्यस्त रस्त्यावर अज्ञात बंदूकधाऱ्यांनी त्याच्या गाडीवर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात मौलानांचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले दोन पोलीस कॉन्स्टेबल गंभीर जखमी झाले आहेत.
गाडीची चाळण; हल्लेखोर फरारघटनेनंतर समोर आलेल्या व्हिडिओ फुटेजमध्ये पांढऱ्या रंगाच्या एका गाडीची मागची काच पूर्णपणे फुटलेली दिसत असून गाडीवर गोळ्यांच्या अनेक खुणा आहेत. या हल्ल्यानंतर परिसरात मोठी गर्दी जमा झाली होती. हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पसार होण्यात यशस्वी झाले. जखमी पोलिसांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
कोण होता इदरीस तरंगजई?मौलाना इदरीस हा पाकिस्तानातील कट्टरपंथी वर्तुळात प्रभावशाली चेहरा होता. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी असलेल्या त्याच्या जवळच्या संबंधांमुळे तो अनेकदा चर्चेत असायचा. या हत्येमागे अंतर्गत वादाचा हात आहे की ही टार्गेट किलिंगची घटना आहे, याचा तपास पाकिस्तानी पोलीस करत आहेत.
Web Summary : Pakistani religious leader Maulana Idris Tarangzai, a Jaish-e-Mohammad supporter, was killed in a gun attack in Charsadda. Two police constables were critically injured. The gunmen fired indiscriminately at his vehicle near a school and fled the scene. Police are investigating the motive behind the killing.
Web Summary : पाकिस्तान के धार्मिक नेता मौलाना इदरीस तरंगजई, जो जैश-ए-मोहम्मद के समर्थक थे, को चरसद्दा में गोली मारकर हत्या कर दी गई। दो पुलिस कांस्टेबल गंभीर रूप से घायल हो गए। बंदूकधारियों ने एक स्कूल के पास उनके वाहन पर अंधाधुंध गोलीबारी की और मौके से फरार हो गए। पुलिस हत्या के पीछे के मकसद की जांच कर रही है।