शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
2
Latest Marathi News LIVE :पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल अरविंद केजरीवालांना शंका, 'या' मुद्द्यावर ठेवले बोट
3
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
4
आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त
5
नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांचा 'ओली' पॅटर्न; भारतासोबत पंगा घेणारे 'हे' २ मोठे निर्णय!
6
'राजा शिवाजी'साठी बॉलिवूड कलाकारांनी किती मानधन घेतलं? रितेश देशमुखचा गौप्यस्फोट, म्हणाला- "अभिषेक बच्चन..."
7
सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी!
8
स्मार्ट होम की मृत्यूचा सापळा? आग लागताच स्मार्ट लॉक खराब; दरवाजा न उघडल्याने ९ जणांचा बळी
9
एमजीआर, एनटीआर ते विजय... दक्षिणेतील मतदार अभिनेत्यांमध्ये नेता का शोधतात? ही आहेत ५ कारणं
10
बनावट जन्म दाखला घोटाळा: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून SITद्वारे सखोल चौकशीचे आदेश
11
British Airways: विमान उडवायचं नाही, फक्त जमिनीवर चालवायचंय; 'ही' एअरलाइन कंपनी पायलट्सना देतेय ९५ लाखांची सॅलरी
12
Mangal Gochar 2026: ११ मे ते २१ जून 'या' तीन राशींसाठी सुवर्णकाळ; मंगळ देणार प्रगतीची मोठी संधी!
13
अरे देवा! मुलीचं मोबाईलचं व्यसन सोडवण्यासाठी आई-वडिलांनी ६५ हजार देऊन ठेवले ४ बाऊन्सर
14
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
15
प्रेयसीच्या भावावर सूड उगवण्यासाठी दीड वर्षाच्या चिमुरडीचा काटा काढला; १३ वर्षांनंतर न्याय मिळालाच!
16
हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव
17
पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर
18
८ महिन्याची गर्भवती, घरोघरी जात केला प्रचार; चक्कर येऊन पडली तरी हिंमत हरली नाही; आज बनली आमदार
19
लग्नाच्या प्रश्नांना अन् दडपणाला कशी सामोरी जातेस? प्राजक्ता माळी म्हणाली, "जे तुमचं असतं..."
20
भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 12:23 IST

Sanjay Raut Opinion on West Bengal ELection Results 2026: इंडिया आघाडीला सगळ्यात जास्त धक्का दिला तो पश्चिम बंगालच्या निकालाने. भाजपाने तब्बल २०६ जागा जिंकत ममता बॅनर्जींना सत्तेवरून खाली खेचले. या निकालावर आता खासदार संजय राऊत यांनी भूमिका मांडली. 

Sanjay Raut Mamata Banerjee Rahul Gandhi: उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुक निकालावर भाष्य करणारी एक पोस्ट शेअर केली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे लक्ष वेधून घेत खासदार संजय राऊत यांनी पश्चिम बंगालमधील निकालाबद्दल काही मुद्दे मांडले आहेत. यात त्यांनी एकूण निवडणूक प्रक्रियेवरच गंभीर शंका उपस्थित केल्या असून, आता ममता बॅनर्जींना साथ द्यायला हवी, असे आवाहन केले आहे. 

खासदार संजय राऊत म्हणाले, "पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा पराभव भाजपाने केला नाही, तर निवडणूक आयोग, केंद्रीय सुरक्षा दले आणि सुमारे तीस लाख मतदारांना मताधिकार नाकारण्याने केला आहे."

महाराष्ट्राचा उल्लेख करत राऊत म्हणाले, 'निवडणूक चोरली'

पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल बोलताना संजय राऊत पुढे म्हणाले की, "ही निवडणूक जिंकली गेली नाही, तर चोरली गेली आहे. आपण ममता दीदींबरोबर उभे राहिले पाहिजे. महाराष्ट्रात, बिहारात, हरयाणात, आसामात, ओडिशात अशाच प्रकारे निवडणूक चोरण्यात आली. या अशा विजयाचे ढोल फुटायला हवेत. जागे व्हा", असे संजय राऊत यांनी ममता बॅनर्जी आणि राहुल गांधींचा उल्लेख करत म्हटले आहेत.

अरविंद केजरीवालांनाही निकालावर शंका

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही या निकालाबद्दल शंका उपस्थित केल्या आहेत. "जी दिल्ली आणि पश्चिम बंगाल भाजपाला मोदी लाट शिखरावर असताना जिंकता आले नाही. २०१५ साली दिल्लीमध्ये आणि २०१६ साली बंगालमध्ये  प्रत्येकी तीन जागा मिळाल्या. त्या दिल्ली आणि बंगालमध्ये भाजपाने अशा काळात विजय मिळवला, जेव्हा मोदींची लोकप्रियता संपूर्ण देशात तळाला चालली आहे, असे कसे?", असा सवाल केजरीवालांनी उपस्थित केला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Mamata lost Bengal! Sanjay Raut tells Rahul, "Wake up now!"

Web Summary : Sanjay Raut alleges foul play in West Bengal elections, claiming the BJP didn't win fairly. He urges Rahul Gandhi and others to support Mamata Banerjee, alleging similar electoral malpractices in other states. Kejriwal also questions BJP's victory amid declining Modi popularity.
टॅग्स :West Bengal Assembly Election 2026पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६Sanjay Rautसंजय राऊतMamata Banerjeeममता बॅनर्जीRahul Gandhiराहुल गांधीtmcठाणे महापालिका