Join us
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या प्रश्नांना अन् दडपणाला कशी सामोरी जातेस? प्राजक्ता माळी म्हणाली, "जे तुमचं असतं..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 12:35 IST

मॅरेज प्रेशर कसं हँडल करते? प्राजक्ता माळी म्हणाली...

प्राजक्ता माळी मराठीतील आघाडीची अभिनेत्री आहे. 'जुळून येतील रेशीमगाठी' मालिकेमुळे तिला कमालीची लोकप्रियता मिळाली. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या सूत्रसंचालनासाठी तिचं कायमच कौतुक झालं. प्राजक्ताने मराठी सिनेमे, वेब सीरिजमध्येही आपली छाप पाडली. ती उत्तम अभिनेत्री तर आहेच मात्र एक चांगली डान्सरही आहे. 'फुलवंती'सिनेमातून ते सर्वांनीच पाहिलं. प्राजक्ता महाराष्ट्राची क्रश आहे. तरुणाई तर तिच्यावर फिदा आहे. प्राजक्ताच्या वैयक्तिक आयुष्यात काय चाललंय हेही जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता असते. प्राजक्ता लग्न कधी करणार हा तर प्रत्येकाला पडलेला प्रश्न आहे. लग्नाचं सोशल प्रेशर ती कशी हँडल करते यावर तिने नुकतंच उत्तर दिलं आहे.

प्राजक्ता माळीने इन्स्टाग्रामवर चाहत्यांच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरं दिली. यावेळी एकाने तिला इंटरेस्टिंग प्रश्न विचारला. "मॅरेज प्रेशर कसं हँडल करतेस? तुला कधी मागे पडल्यासारखं वाटतं का त्याचं टेन्शन येतं का?' यावर प्राजक्ता म्हणाली, "जेव्हा गोष्ट घडायची आहे ती त्यावेळी घडेलच यावर माझा विश्वास आहे. आणि जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. जे तुमचं आहे ते कसंही करुन तुमच्यापर्यंत पोहोचतं. हां, घरच्यांना ही फिलॉसॉफी समजावणं अवघड आहे. ते मलाही जमत नाही..."

जेव्हा कधी निराश झाल्यासारखं वाटतं तेव्हा प्राजक्ता काय करते? म्हणाली, "जेव्हा मला निराश वाटतं तेव्हा मी मेडिटेशन करते. ध्यानधारणेने मला रिचार्ज वाटतं आणि पुन्हा ऊर्जा निर्माण झाल्यासारखं वाटतं. कामातूनही मला प्रेरणा मिळते."

प्राजक्ता माळी शेवटची 'फुलवंती' सिनेमात दिसली. २०२४ साली हा सिनेमा आला होता. तर मधल्या काळात ती 'देवखेळ' या वेबसीरिजमध्ये दिसली. आता प्राजक्ता जून नंतर एखाद्या प्रोजेक्टमध्ये दिसू शकते असाही तिने खुलासा केला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Prajakta Mali on handling marriage pressure: 'What's yours will reach you.'

Web Summary : Actress Prajakta Mali addresses marriage pressure, stating she believes things happen when they should and what belongs to you will find you. Meditation helps her when feeling down. She was last seen in 'Phulwanti' and 'Devkhel,' and will soon be seen in a new project.
टॅग्स :प्राजक्ता माळीमराठी अभिनेतालग्न