शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
2
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
3
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
4
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
5
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
6
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
7
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
8
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
9
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
10
Latest Marathi News LIVE :पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल अरविंद केजरीवालांना शंका, 'या' मुद्द्यावर ठेवले बोट
11
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
12
'राजा शिवाजी' सिनेमाचा सीक्वल येणार? रितेश देशमुखने अखेर सांगितलं, म्हणाला- "अजून खूप..."
13
आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त
14
नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांचा 'ओली' पॅटर्न; भारतासोबत पंगा घेणारे 'हे' २ मोठे निर्णय!
15
'राजा शिवाजी'साठी बॉलिवूड कलाकारांनी किती मानधन घेतलं? रितेश देशमुखचा गौप्यस्फोट, म्हणाला- "अभिषेक बच्चन..."
16
सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी!
17
स्मार्ट होम की मृत्यूचा सापळा? आग लागताच स्मार्ट लॉक खराब; दरवाजा न उघडल्याने ९ जणांचा बळी
18
एमजीआर, एनटीआर ते विजय... दक्षिणेतील मतदार अभिनेत्यांमध्ये नेता का शोधतात? ही आहेत ५ कारणं
19
बनावट जन्म दाखला घोटाळा: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून SITद्वारे सखोल चौकशीचे आदेश
20
British Airways: विमान उडवायचं नाही, फक्त जमिनीवर चालवायचंय; 'ही' एअरलाइन कंपनी पायलट्सना देतेय ९५ लाखांची सॅलरी
Daily Top 2Weekly Top 5

अरे देवा! मुलीचं मोबाईलचं व्यसन सोडवण्यासाठी आई-वडिलांनी ६५ हजार देऊन ठेवले ४ बाऊन्सर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 13:05 IST

एका १६ वर्षीय मुलीच्या मोबाईलच्या वेडाने तिच्या कुटुंबाला इतकं हादरवून सोडलं की, त्यांना स्वतःच्याच मुलीवर नजर ठेवण्यासाठी प्रोफेशनल बाऊन्सर्सची मदत घ्यावी लागली.

आजच्या युगात मुलं आणि स्मार्टफोन यांच्यातील नातं कोणापासूनही लपलेलं नाही. मात्र अहमदाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. परिस्थिती किती भयावह असू शकते हे यातून समोर आलं आहे. एका १६ वर्षीय मुलीच्या मोबाईलच्या वेडाने तिच्या कुटुंबाला इतकं हादरवून सोडलं की, त्यांना स्वतःच्याच मुलीवर नजर ठेवण्यासाठी प्रोफेशनल बाऊन्सर्सची मदत घ्यावी लागली.

अहमदाबादमध्ये राहणाऱ्या या मुलीला सोशल मीडिया आणि फोटो-शेअरिंग एप्सचं असं व्यसन होतं की, ती तासनतास अनोळखी लोकांशी गप्पा मारू लागली. धक्कादायक बाब म्हणजे ती घरातून गुपचूप ऑनलाईन भेटलेल्या अनोळखी व्यक्तींना खरोखर बाहेर भेटायला जाऊ लागली. पालकांनी जेव्हा तिचा मोबाईल काढून घेतला, तेव्हा तिचं वागणं अत्यंत हिंसक झालं आणि पालकांची चिंता अधिकच वाढली.

फोन हिसकावला तर घरातील सामान बाहेर फेकलं

जेव्हा पालकांनी मुलीला सुधारण्यासाठी फोन परत घेतला, तेव्हा तिने रागाच्या भरात आपल्या आईवर हल्ला केला आणि घरातील सामानाची तोडफोड सुरू केली. एका घटनेत तर तिने आपल्या हाय-राईज फ्लॅटच्या खिडकीतून टेलिव्हिजन आणि मायक्रोवेव्ह सारखी महागडी उपकरणं खाली फेकून दिली. डॉक्टर मृगेश वैष्णव यांच्या मते, अशा गंभीर परिस्थितीत औषधांसोबतच नीट देखरेखीचीही गरज होती.

४ बाउन्सर आणि ६५ हजारांचा खर्च

मुलीची सुरक्षा आणि तिचं वागणं नियंत्रित करण्यासाठी कुटुंबाने ४ बाऊन्सर्सना दोन शिफ्टमध्ये कामावर ठेवलं आहे. यासाठी ते दरमहा सुमारे ६५,००० रुपये खर्च करत आहेत. बाऊन्सर्सचं काम रात्रंदिवस मुलीवर नजर ठेवणं आहे, जेणेकरून ती पुन्हा कोणतंही धोकादायक पाऊल उचलणार नाही.

८ बाउन्सर तैनात

सुरक्षा यंत्रणांचं म्हणणं आहे की, आता अशी प्रकरणं वेगाने वाढत आहेत. सूरतमध्ये एका कुटुंबाने आपल्या १७ वर्षांच्या मुलाच्या गेमिंगच्या व्यसनासाठी ८ बाउन्सर तैनात केले होते. वडोदरा आणि राजकोटमध्येही पालक मुलांचे हिंसक वर्तन, अमली पदार्थ किंवा चुकीची संगत रोखण्यासाठी सुरक्षा सेवांचा आधार घेत आहेत, ज्याचा खर्च महिन्याला ५०,००० रुपयांहून अधिक येतो.

मानसिक आरोग्य तज्ज्ञांचं मत आहे की, कोरोना महामारीनंतर डिजिटल अवलंबित्व खूप वाढलं आहे. डॉक्टर वैष्णव म्हणतात की, हे व्यसन आता अंमली पदार्थ किंवा दारूच्या व्यसनासारखंच धोकादायक आहे, जिथे पारंपारिक पद्धती काम करत नाहीत आणि मुलांना अनेक महिने रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासते.

English
हिंदी सारांश
Web Title : Parents hire bouncers for daughter addicted to mobile; spend $780 monthly.

Web Summary : Ahmedabad parents hired four bouncers for their 16-year-old daughter addicted to social media after she became violent and met strangers. They spend approximately $780 monthly. Such cases are rising, with families in other cities also employing security for addiction and behavioral issues.
टॅग्स :ahmedabadअहमदाबादSmartphoneस्मार्टफोन