शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत...
2
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
3
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
4
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
5
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
6
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
7
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
8
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
9
Latest Marathi News LIVE :राज्यातील २४ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
11
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; दर १,४८,००० रुपयांच्या खाली, चांदीही स्वस्त
12
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
13
कळस गाठला! ज्याला पोटच्या पोरासारखं मानलं, त्यानेच संपवलं; निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या
14
Astro Tip: नकारात्मक लोकांमुळे तुमची ऊर्जा कमी होतेय? 'हा' सोपा उपाय नक्की करून पहा!
15
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
16
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
17
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
18
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
19
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
20
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
Daily Top 2Weekly Top 5

ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 14:44 IST

Mamata Banerjee Politics: ममता बॅनर्जी भवानीपूर मतदारसंघातून पराभूत. बंगालमध्ये भाजपचे सरकार. आता ममता बॅनर्जींची पुढची राजकीय चाल काय?

गेली १५ वर्षे पश्चिम बंगालच्या राजकारणात एकछत्री अंमल गाजवणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्यासाठी २०२६ चे निकाल 'राजकीय भूकंप' ठरले आहेत. ज्या भवानीपूर मतदारसंघाने ममता बॅनर्जींना मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचवले, त्याच पारंपरिक बालेकिल्ल्यात भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी त्यांचा १५,१०५ मतांनी पराभव केला. गेल्या दोन निवडणुकांत ममतांचा सुवेंदू यांनी केलेला हा दुसरा पराभव आहे. कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...

ममता गेल्या निवडणुकीत नंदीग्राममधून सुवेंदू अधिकारी यांच्याविरोधात उभ्या ठाकल्या होत्या. तिथे त्यांचा पराभव झाला होता. यंदाच्या निवडणुकीत सुवेंदू अधिकारी यांनी नंदीग्राम आणि ममतांच्या भवानीपूरमधून देखील निवडणूक लढविली होती. या दोन्ही ठिकाणी सुवेंदू अधिकारी मताधिक्याने निवडून आले आहेत. ममतांकडे आता सत्ता नाही तसेच आमदारकी देखील नाही यामुळे त्यांना विधानसभेचे सदस्यत्व मिळणार नाही. यामुळे ममता पुढे काय करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशातच ममतांकडे विधानसभेवर निवडून जाऊन विरोधी पक्षनेता बनण्याची संधी आहे. 

पोटनिवडणुकीद्वारे पुनरागमन...सुवेंदू अधिकारी दोन जागांवरून निवडून आले आहेत, त्यामुळे त्यांना एका जागेचा राजीनामा द्यावा लागेल. अशा रिक्त होणाऱ्या जागेवरून ममता बॅनर्जी पोटनिवडणूक लढवू शकतात. जर त्या निवडून आल्या, तर विधानसभेत 'विरोधी पक्षनेता' म्हणून त्या भाजप सरकारला धारेवर धरू शकतील. आता सुवेंदू अधिकारी कोणत्या मतदारसंघातून आमदारकीचा राजीनामा देतात यावर सारे अवलंबून असणार आहे.  त्याचप्रमाणे, हुमायून कबीर हे रेजीनगर आणि नौदा या दोन मतदारसंघांतून निवडून आले आहेत. त्यांनाही एका जागेचा राजीनामा द्यावा लागेल.

ममतांसमोर आव्हान : पक्षाला फुटीपासून वाचवणेसत्ता गेल्यानंतर अनेकदा आमदार पक्षांतर करतात. ८१ आमदारांचे संख्याबळ राखणे आणि अभिषेक बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची फेररचना करणे ही ममतांसमोरची सर्वात मोठी अग्निपरीक्षा असेल.

'विरोधकांची योद्धा'?ममता बॅनर्जी या उपजतच 'फायटर' नेत्या आहेत. १९८४ मध्ये त्यांनी सोमनाथ चॅटर्जींसारख्या दिग्गज नेत्याला हरवून आपली कारकीर्द सुरू केली होती. आता पुन्हा एकदा शून्यातून विश्व निर्माण करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. विधानसभेबाहेर राहून रस्त्यावरची लढाई लढण्यात ममता वाकबगार आहेत, त्यामुळे बंगालमध्ये त्या 'विरोधकांची योद्धा' म्हणून कशा प्रकारे समोर येतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 

English
हिंदी सारांश
Web Title : Mamata Banerjee's options: By-election or Opposition Leader after poll setback?

Web Summary : After defeat, Mamata Banerjee faces challenges: re-election via by-poll from a vacated seat or leading the opposition. Party unity and restructuring under Abhishek Banerjee are crucial.
टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीTrinamool Congressतृणमूल काँग्रेसBJPभाजपाWest Bengal Assembly Election 2026पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६Assembly Election Resultsविधानसभा निवडणूक निकाल २०२६