Gold Silver Rate Today: सोन्याच्या किमतीत आज पुन्हा एकदा घट पाहायला मिळाली आहे. सोन्याचा दर आता १,४८,००० रुपयांच्या खाली आला आहे. बुलियन्स मार्केटमध्ये आज २४ कॅरेट सोन्याचा भाव १,४७,५५७ रुपये झालाय. सोमवारी सकाळी हा दर १,४८,३५७ रुपये प्रति १० ग्रॅम होता. म्हणजेच कालच्या तुलनेत आज सोन्याचे दर ८०० रुपयांनी घसरलेत. सोन्यासोबतच चांदीच्या किमतीतही मोठी घसरण नोंदवण्यात आली.
२३ ते १४ कॅरेट सोन्याचे आजचे दर
इंडियन बुलियन्स ज्वेलर्स असोसिएशनच्या (IBJA) अहवालानुसार, आजचे दर खालीलप्रमाणे आहेत:
२३ कॅरेट सोनं : १,४६,९६६ रुपये प्रति १० ग्रॅम.२२ कॅरेट सोनं : १,३५,१६२ रुपये प्रति १० ग्रॅम.१८ कॅरेट सोनं : १,१०,६६८ रुपये प्रति १० ग्रॅम.१४ कॅरेट सोन : ८६,३२१ रुपये प्रति १० ग्रॅम.
चांदीचा आजचा भाव
ibjarates ने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, काल १ किलो चांदीचा दर २,४४,२३७ रुपये होता. कालच्या तुलनेत आज चांदीच्या किमतीत ४,७३५ रुपयांची मोठी घसरण झाली आहे. आज बुलियन्स मार्केटमध्ये १ किलो चांदीचा भाव २,३९,५०२ रुपये प्रति किलोवर पोहोचलाय.
विक्रमी उच्चांकावरून किती घसरले दर?
२९ जानेवारी २०२६ रोजी बुलियन्स मार्केटमध्ये सोन्याने १,७५,३४० रुपये प्रति १० ग्रॅमचा ऐतिहासिक उच्चांक गाठला होता. तेव्हापासून आतापर्यंत सोन्याच्या किमतीत २७,७८३ रुपयांची घट झाली आहे. दुसरीकडे, चांदी तिच्या ३,७९,९८८ रुपयांच्या विक्रमी उच्चांकावरून १,४०,४८६ रुपयांनी स्वस्त झाली आहे.
सोन्याचे दर का घसरत आहेत?
सोन्याच्या किमतीत होत असलेल्या या घसरणीमागे खालील प्रमुख कारणे आहेत:
डॉलरचा प्रभाव : डॉलरच्या तुलनेत रुपया पुन्हा कमकुवत झाला आहे. डॉलर इंडेक्समध्ये सातत्याने होणाऱ्या वाढीचा परिणाम सोन्याच्या किमतीवर होत असून गुंतवणूकदार सध्या सोन्याऐवजी डॉलरला अधिक पसंती देत आहेत.
कच्च्या तेलाचे दर : कच्च्या तेलाच्या किमतीत होणाऱ्या वाढीचाही सोन्यावर वाईट परिणाम झाला आहे. महागाई वाढण्याच्या भीतीनं सोन्याचे दर सातत्यानं खाली येत आहेत.
गुंतवणूकदारांची मानसिकता : सोन्यानं विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर परिणाम झाला होता. सोनं हळूहळू सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात होतं, ज्यामुळे मागणी कमी झाली आणि आता दरात घसरण पाहायला मिळत आहे.
Web Summary : Gold prices dipped below ₹1,48,000, a ₹800 decrease. Silver also saw a significant drop, reaching ₹2,39,502 per kg. The fall is attributed to a stronger dollar, rising crude oil prices, and investor sentiment.
Web Summary : सोने की कीमतें गिरकर ₹1,48,000 से नीचे, ₹800 की गिरावट। चांदी में भी भारी गिरावट आई, जो ₹2,39,502 प्रति किलो तक पहुंच गई। गिरावट का कारण डॉलर की मजबूती, कच्चे तेल की बढ़ती कीमतें और निवेशकों की धारणा है।