Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?

दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?

Biocon Latest Updates: भारतातील आघाडीची बायोटेक्नॉलॉजी कंपनी 'बायोकॉन'च्या भविष्याबाबत एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. पाहा कोण आहेत त्यांच्या उत्तराधिकारी.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 14:49 IST2026-05-05T14:42:11+5:302026-05-05T14:49:25+5:30

Biocon Latest Updates: भारतातील आघाडीची बायोटेक्नॉलॉजी कंपनी 'बायोकॉन'च्या भविष्याबाबत एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. पाहा कोण आहेत त्यांच्या उत्तराधिकारी.

Kiran Mazumdar Shaw founder of giant company Biocon has chosen a successor know who is claire mazumdar | दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?

दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?

Biocon Latest Updates: भारतातील आघाडीची बायोटेक्नॉलॉजी कंपनी 'बायोकॉन'च्या (Biocon) भविष्याबाबत एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. कंपनीच्या संस्थापक आणि चेअरपर्सन किरण मजुमदार-शॉ यांनी त्यांची पुतणी क्लेअर मजुमदार यांना आपला उत्तराधिकारी म्हणून घोषित केलंय. 'फॉर्च्यून इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली.

चार दशकांपूर्वी बायोकॉनची स्थापना करणाऱ्या किरण मजुमदार-शॉ यांना अपत्य नाही. ३७ वर्षीय क्लेअर मजुमदार कंपनीच्या पुढील टप्प्यातील वाढीचं नेतृत्व करण्यास पूर्णपणे सक्षम आहेत, असं त्यांचं मत आहे. भविष्यातील ही प्रगती प्रगत बायोटेक्नॉलॉजी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) वर आधारित असेल.

विमान उडवायचं नाही, फक्त जमिनीवर चालवायचंय; 'ही' एअरलाइन कंपनी पायलट्सना देतेय ९५ लाखांची सॅलरी

कुटुंबातील इतर सदस्यांचंही लाभणार सहकार्य

किरण मजुमदार-शॉ यांनी सांगितले की, भविष्यात क्लेअर यांचा भाऊ एरिक मजुमदार (जे कॅलटेक येथे प्रोफेसर आणि AI तज्ज्ञ आहेत) आणि क्लेअर यांचे पती थॉमस रॉबर्ट्स (जे मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटलमध्ये ऑन्कोलॉजिस्ट आहेत) बायोकॉनच्या कौटुंबिक इकोसिस्टमला अधिक बळकट करतील.

किरण मजुमदार-शॉ यांचं विधान

"मी बायोकॉनची एकमेव मालकीण आहे आणि कंपनी योग्य हातांत जाईल याची खात्री करणं माझी जबाबदारी आहे. मी माझी पुतणी क्लेअरची उत्तराधिकारी म्हणून निवड केली आहे, कारण तिने एक कंपनी यशस्वीपणे चालवून दाखवली आहे." असं उत्तराधिकारी निवडीबाबत बोलताना त्या म्हणाल्या.

कोण आहेत क्लेअर मजुमदार?

क्लेअर मजुमदार सध्या 'बिकारा थेरेप्यूटिक्स'च्या संस्थापक आणि सीईओ आहेत. ही कंपनी NASDAQ वर लिस्टेड असून बायोकॉनद्वारे इनक्यूबेट करण्यात आली होती. त्यांनी MIT आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतलं असून, त्यांच्याकडे कॅन्सर बायोलॉजीमध्ये पीएचडी (PhD) पदवी आहे. २०२४ मध्ये लिस्ट झालेल्या बिकारा थेरेप्यूटिक्सचे मार्केट कॅप १.६ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे.

कर्जमुक्ती आणि सुटसुटीत व्यवसाय

बायोकॉनने अलीकडेच जेनेरिक आणि बायोलॉजिक्स व्यवसायांचं विलीनीकरण केलं आहे, ज्यामुळे कंपनीचं कर्ज कमी झालं असून संरचनेत सुटसुटीतपणा आला आहे. सध्या कंपनीचे मुख्य लक्ष 'बायोसिमिलर'वर आहे, ज्याचा कंपनीच्या महसुलात सुमारे ६०% वाटा आहे. कंपनीची १२ उत्पादनं आधीच बाजारात आहेत, तर सुमारे २० उत्पादने पाईपलाईनमध्ये आहेत.

समूहाच्या कंपन्यांच्या नेतृत्वातही बदल

श्रीहास तांबे यांनी बायोकॉन बायोलॉजिक्सच्या सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. तर सिद्धार्थ मित्तल १ जुलैपासून 'सिंजेन इंटरनॅशनल'चे नेतृत्व करतील. किरण मजुमदार-शॉ यांच्या मते, समूहाची भविष्यातील प्रगती ही डिफरेंशिएटेड बायोसिमिलर, मूळ बायोलॉजिक औषधं आणि संशोधन व विकास (R&D) प्लॅटफॉर्ममध्ये AI चा सखोल वापर यावर अवलंबून असेल. हा बदल भारतीय बायोटेक उद्योगासाठी एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

Web Title : बायोकॉन की संस्थापक किरण मजूमदार-शॉ ने भतीजी को उत्तराधिकारी बनाया

Web Summary : बायोकॉन की किरण मजूमदार-शॉ ने अपनी भतीजी, क्लेयर मजूमदार को भविष्य में वृद्धि का नेतृत्व करने के लिए उत्तराधिकारी नियुक्त किया। क्लेयर, बिकारा थेरेप्यूटिक्स की सीईओ हैं, जिनके पास कैंसर बायोलॉजी में पीएचडी है। यह उत्तराधिकार योजना एआई एकीकरण के साथ बायोकॉन की निरंतर सफलता सुनिश्चित करती है।

Web Title : Biocon Founder Kiran Mazumdar-Shaw Names Niece as Successor

Web Summary : Biocon's Kiran Mazumdar-Shaw appointed her niece, Claire Mazumdar, as successor to lead future growth. Claire, CEO of Bicara Therapeutics, holds a PhD in cancer biology and has a strong background in biotechnology. This succession plan ensures Biocon's continued success with AI integration.