शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
2
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
3
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
4
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
5
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
6
पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत...
7
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
8
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
9
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
10
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
11
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
12
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
13
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
14
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
15
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
16
Latest Marathi News LIVE :राज्यातील २४ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
17
वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
18
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; दर १,४८,००० रुपयांच्या खाली, चांदीही स्वस्त
19
कळस गाठला! ज्याला पोटच्या पोरासारखं मानलं, त्यानेच संपवलं; निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या
20
Astro Tip: नकारात्मक लोकांमुळे तुमची ऊर्जा कमी होतेय? 'हा' सोपा उपाय नक्की करून पहा!
Daily Top 2Weekly Top 5

Astro Tip: नकारात्मक लोकांमुळे तुमची ऊर्जा कमी होतेय? 'हा' सोपा उपाय नक्की करून पहा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 15:24 IST

Astro Tip : परिस्थिती बदलता येत नाही तेव्हा मनस्थिती बदला, यासाठी ज्योतिष शास्त्राचा छोटासा उपाय करेल नकारात्मक ऊर्जेपासून तुमचे रक्षण!

सभोवतालच्या वातावरणाचा आणि लोकांच्या विचारांचा आपल्या मनावर खोलवर परिणाम होत असतो. अनेकदा आपल्याला अशा व्यक्ती भेटतात, ज्यांच्याशी बोलल्यानंतर आपल्याला खूप थकल्यासारखे वाटते किंवा मनावर एक प्रकारचे दडपण येते. यालाच 'एनर्जी ड्रेन' (Energy Drain) किंवा नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव असे म्हणतात.

हे ही वाचा : Mangal Gochar 2026: ११ मे ते २१ जून 'या' तीन राशींसाठी सुवर्णकाळ; मंगळ देणार प्रगतीची मोठी संधी!

अशा नकारात्मक लोकांपासून स्वतःच्या ऊर्जेचे रक्षण कसे करावे, याबद्दल ज्योतिष अभ्यासक शिरीष कुलकर्णी यांनी एक अत्यंत सोपा आणि प्रभावी उपाय सांगितला आहे.

आपण घरी असू किंवा ऑफिसमध्ये, आपल्याला विविध प्रवृत्तीच्या लोकांशी संवाद साधावा लागतो. काही लोक उत्साही असतात, तर काही सतत तक्रार करणारे किंवा नकारात्मक विचार पसरवणारे असतात. अशा व्यक्तींशी संवाद झाला की आपली सकारात्मक ऊर्जा कमी होऊ लागते. या समस्येवर ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून ज्योतिष अभ्यासक शिरीष कुलकर्णी यांनी 'खडे मीठ' (Rock Salt) वापरण्याचा सल्ला दिला आहे.

हे ही वाचा : Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!

काय आहे हा उपाय?

शिरीष कुलकर्णी यांच्या मते, नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी करण्यासाठी खडे मीठ हे अत्यंत गुणकारी आहे. त्यांनी सांगितलेली पद्धत खालीलप्रमाणे आहे:

१. सोबत खडे मीठ ठेवा: तुमचे घर असो वा ऑफिसचे टेबल, आपल्या जवळ एका छोट्या डबीत किंवा वाटीत थोडे खडे मीठ नेहमी ठेवा.२. ऊर्जेचा अभाव जाणवल्यास: समजा, एखाद्या व्यक्तीशी बोलल्यानंतर तुम्हाला अचानक अस्वस्थ वाटू लागले, डोके जड झाले किंवा तुमची ऊर्जा कमी झाल्याचे जाणवले, तर त्वरित हा उपाय करा.३. मीठ हातावर चोळा: थोडेसे खडे मीठ हातावर घ्या आणि ते दोन्ही हातांच्या तळव्यांवर हलक्या हाताने चोळा.४. हात स्वच्छ धुवा: त्यानंतर बेसिनमध्ये पाण्याने आपले हात स्वच्छ धुवून घ्या.

हा उपाय केल्यावर तुम्हाला लगेचच हलकेपणा आणि सकारात्मक बदल जाणवेल.

हे ​​​ही वाचा : Numerology: 'या' जन्मतारखेचे लोक असतात अति संवेदनशील; सभोवतालच्या वातावरणाचा खोलवर होतो परिणाम

या उपायामागचे महत्त्व

ज्योतिषशास्त्र आणि वास्तुरचना शास्त्रात मिठाला नकारात्मकता शोषून घेणारा घटक मानले जाते. खडे मीठ हे नैसर्गिक स्वरूपात असल्याने त्यामध्ये नकारात्मक लहरी खेचून घेण्याची क्षमता जास्त असते. जेव्हा आपण ते हातावर चोळून पाण्याने धुतो, तेव्हा आपल्या शरीराच्या बाह्य थरावरील साचलेली नकारात्मक ऊर्जा (Aura) स्वच्छ होण्यास मदत होते.

नकारात्मक लोकांशी संवाद टाळणे नेहमीच शक्य नसते, पण त्यांच्यामुळे स्वतःचे मानसिक स्वास्थ्य बिघडू न देणे आपल्या हातात आहे. शिरीष कुलकर्णी यांनी सांगितलेला हा खडे मिठाचा छोटासा प्रयोग तुमच्या दैनंदिन जीवनात सकारात्मकता टिकवून ठेवण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Astro Tip: Use rock salt to ward off negative energy!

Web Summary : Feeling drained by negative people? Astrology expert Shirish Kulkarni suggests using rock salt. Keep it nearby and rub it on your hands if you feel negativity, then wash. This simple remedy can help cleanse your aura and boost positivity.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषTraditional Ritualsपारंपारिक विधीVastu shastraवास्तुशास्त्र