आजच्या धावपळीच्या जगात आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. अनेक जण काम करूनच थकून जात असल्याने व्यायाम करण्यासाठी वेळच काढत नाहीत. अशातच तैवानची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर सध्या वयोवृद्ध व्यक्ती जिममध्ये वर्कआउट करतानाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. वय जास्त असताना फिटनेसकडे कशा प्रकारे लक्ष देता येतं हेच ते दाखवून देत आहेत. या व्हिडिओमध्ये तरुणांना लाजवेल अशा उत्साहात वृद्ध वजन उचलून व्यायाम करताना दिसत आहे, ज्यामुळे नेटिझन्सकडून त्यांचं भरभरून कौतुक केलं जात आहे.
"वय हा केवळ एक आकडा आहे" ही म्हण त्यांनी आपल्या कृतीतून सार्थ ठरवली आहे. या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर फिटनेस संदर्भात नवी चर्चा सुरू झाली असून, वृद्धावस्थेतही व्यायाम किती महत्त्वाचा आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. तैवान आता 'सुपर-एज्ड सोसायटी' बनला आहे. मात्र येथील ज्येष्ठ नागरिक केवळ घरी बसून न राहता, शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी मोठ्या संख्येने जिमचा रस्ता धरत असल्याचं आशादायक चित्र समोर येत आहे.
तैवानमधील २०% पेक्षा जास्त लोकसंख्या आता ६५ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची आहे. जेव्हा वाढत्या वयासोबत येणारे आजार आणि एकटेपणा दूर करण्यासाठी तैवानमधील वृद्धांनी आता 'फिटनेस'ला जवळ केलं आहे. शहरांमधील अनेक जिममध्ये आता तरुणांइतकीच संख्या वृद्धांचीही दिसत आहे. हाडं कमकुवत होणं आणि स्नायूंची ताकद कमी होणं यांसारख्या समस्या टाळण्यासाठी वृद्ध नागरिक 'वेट ट्रेनिंग' आणि 'स्ट्रेंथ ट्रेनिंग'वर भर देत आहेत.
निवृत्तीनंतर येणारे नैराश्य टाळण्यासाठी आणि मेंदूची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी व्यायामाचा मोठा उपयोग होत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मानसिक आरोग्य चांगलं राहतं. जिममध्ये एकत्र आल्यामुळे समवयस्क लोकांशी संवाद होतो, ज्यामुळे सामाजिक एकाकीपणा दूर होण्यास मदत होत आहे. अनेक ठिकाणी वृद्धांसाठी खास प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे, जे त्यांच्या वयानुसार सुरक्षित व्यायाम करण्याचे मार्गदर्शन करतात.
Web Summary : Taiwan's aging population is actively pursuing fitness in gyms. Defying age, seniors engage in weight training to combat age-related ailments and loneliness. Experts highlight exercise's role in mental well-being and social interaction, fostering a healthy and active lifestyle in later years.
Web Summary : ताइवान की वृद्ध आबादी सक्रिय रूप से जिम में फिटनेस अपना रही है। उम्र को मात देते हुए, वरिष्ठ नागरिक उम्र से संबंधित बीमारियों और अकेलेपन से निपटने के लिए वेट ट्रेनिंग में लगे हुए हैं। विशेषज्ञ मानसिक कल्याण और सामाजिक संपर्क में व्यायाम की भूमिका पर प्रकाश डालते हैं, जिससे बाद के वर्षों में एक स्वस्थ और सक्रिय जीवन शैली को बढ़ावा मिलता है।