शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
2
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
3
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
4
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
5
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
6
पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत...
7
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
8
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
9
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
10
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
11
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
12
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
13
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
14
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
15
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
16
Latest Marathi News LIVE :राज्यातील २४ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
17
वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
18
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; दर १,४८,००० रुपयांच्या खाली, चांदीही स्वस्त
19
कळस गाठला! ज्याला पोटच्या पोरासारखं मानलं, त्यानेच संपवलं; निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या
20
Astro Tip: नकारात्मक लोकांमुळे तुमची ऊर्जा कमी होतेय? 'हा' सोपा उपाय नक्की करून पहा!
Daily Top 2Weekly Top 5

वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 15:11 IST

Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशमधील सिद्धार्थनगर जिल्ह्यातील एका गावात जल जीवन मिशनअंतर्गत बांधण्यात येत असलेली पाण्याची एक टाकी वादळात उडून नुकसानग्रस्त झाल्याची घटना समोर आली आहे.

उत्तर प्रदेशमधील सिद्धार्थनगर जिल्ह्यातील एका गावात जल जीवन मिशनअंतर्गत बांधण्यात येत असलेली पाण्याची एक टाकी वादळात उडून नुकसानग्रस्त झाल्याची घटना समोर आली आहे. ही दुर्घटना आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. या पाण्याच्या टाकीच्या बांधकामाचा ठेका घेतलेल्या मेघा इंजिनियरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे कर्मचारी टाकीच्या वरच्या भागात झिंक अॅलम मटेरियलची बोल्टिंग करत होते. तेवढ्यात अचानक आलेल्या वेगवान वाऱ्यामुळे बांधकाम सुरू असलेला टॉप रूफ  तुटून उडाला आणि अधांतरी अडकला. मात्र  हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यामुळे कामगार आधीच खाली उतरले होते. त्यामुळे या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

हैदराबाद  येथील मेघा इंजिनियरिंग  कंपनीद्वारे बांधण्यात येत असलेल्या पाण्याच्या या टाकीच्या बांधकामाचा एकूण खर्च हा  ३२ लाख  ४१ हजार रुपये एवढा असल्याचे सांगण्यात येत आहे. दीड लाख लीटर एवढी साठवण क्षमता असलेली ही टाकी निर्माणाधिन अवस्थेत असतानाच वेगवान वाऱ्यामुळे तिचं मोठ्या  प्रमाणावर नुकसान झालं.

दरम्यान,  या कंपनीला जिल्ह्यामधील सुमारे १५०  पाण्याच्या टाक्यांच्या बांधकामाचा ठेका मिळालेला आहे.  स्थानिकांनी जेव्हा पाण्याच्या टाकीचा वरचा भाग कोसळताना पाहिले तेव्हा गावात  गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. मात्र कामगारांनी प्रसंगावधान दाखवल्याने मोठी दुर्घटना टळली.

English
हिंदी सारांश
Web Title : Water Tank Destroyed by Storm; Under Construction, No Casualties

Web Summary : A water tank under construction in Uttar Pradesh collapsed due to strong winds. The under-construction tank, part of the Jal Jeevan Mission, was being built by a Hyderabad-based company. Workers had evacuated following weather warnings, preventing injuries. The incident caused panic in the village.
टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशAccidentअपघात